Ticker

6/Breaking/ticker-posts

अनोखे आंदोलन :आयुक्तांच्या दालनात गढूळ पाणी व चिखल पूजा अन् दगडांचा प्रसाद

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नगर: शहरातील पाणीपुरवठा बोजवारा प्रकरणी महापालिकेत एल्गार करण्यात आला. विशेष करून आगरकर मळ्यात गेल्या दोन महिन्यापासून दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटलेली आहे. अनेक ठिकाणी खोदून ठेवलं आहे.  यामुळे सर्व ठिकाणी पाणी आणि चिखल झाला आहे. याच्या निषेधार्थ जागरूक नागरिक मंचाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.

मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे, कैलास दळवी, अभय गुंदेचा, संजय झिंजे यांनी महानगरपालिकेमध्ये जाऊन आयुक्तांना आणि  पाणीपुरवठा विभागाला घेराव घालण्यात आला. आयुक्तांच्या दालनाला कुलूप लावले व आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला.

यावेळी आगरकर मळ्यातील साचलेला गाळ आणि चिखल नागरिकांनी एका बॉक्समध्ये भरून आणला आणि तो चिखल आयुक्तांच्या दालनासमोर ठेवण्यात आला. त्याची पूजा करून आरती करण्यात आली. त्यासाठी खास तृतीय पंथीयांना बोलावण्यात आले होते. जे कोणी सभ्य व सुशिक्षित नागरिक पाणी पट्टी, घरपट्टी कर भरत आहेत आणि हे कर भरण्याविषयी ज्यांना जाणीव आहे. तसेच, ज्यांनी  भ्रष्ट नगरसेवकांकडून मतदानासाठी पैसे घेतलेले नाहीत, अशा प्रामाणिक आणि जागरूक नागरिकांनी  या आंदोलनाला  पाठिंबा देण्याचे आवाहन सुहास मुळे यांनी केले.त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.

आयुक्त गोरे बाहेरुनच पसार

 मनपा आयुक्त शंकर गोरे यांना वारंवार फोन करून बोलावण्यात आले होते. आंदोलनकर्ते आयुक्तांचे स्वीय सहायक गोरे यांच्या संपर्कात होते. आगरकर मळा  येथील दूषित पाणी पुरवठा आणि लिकेज असलेली  पाईपलाईन दुरुस्त करण्याबाबत ठोस असे आश्वासन देण्याची कुवत महापालिकेकडे नसल्याकारणाने, मनपा आयुक्त शंकर गोरे हे आपण आंदोलन स्थळी आलो तर आपल्या तोंडाला  काळे फासले जाईल या भीतीने आंदोलन स्थळी येत नसावेत अशी चर्चा उपस्थित नागरिकामध्ये होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या