गटविकास अधिकारी यांनी दिले सखोल चौकशीचे आदेश
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
जामखेड: तालुक्यातील शिऊर ग्रामस्थांच्या आमरण उपोषण आंदोलनाला यश आले असून त्या दलित वस्तीच्या
कामांच्या सखोल चौकशीचे आदेश गटविकास अधिकार्यानी दिले, चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करून 15 दिवसात
अहवाल सादर करण्याचे आदेश समितीला दिले आहेत. तसे लेखी पत्र गटविकास अधिकारी
प्रकाश पोळ यांनी उपोषणकर्त्याना दिल्याने हे आंदोलन मागे घेतले.
शिऊर येथील ग्रामस्थांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केलेला आहे . शिऊर ता . जामखेड . येथे ग्रामपंचायतला सन २०१ ९ ते २०२१ या वर्षातील दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्ता , पाणीपुरवठा , एल ई डी बल्ब व रस्ता यासाठी १७ लाखाचा निधी आला होता. परंतु सदर निधी दलित वस्तीमध्ये कुठे खर्च केलेला आढळून आला नाही. याबाबत संबंधित ग्रामसेवक यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी उपोषणास बसले होते. यानुसार तहसीलदार योगेश चंद्रे , गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, यांनी संबंधित उपोषणस्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केली
या नुसार शिऊर ग्रामपंचायत अंतर्गत एक
चौकशी समिती गठीत करण्यात येत आहे. सदर समितीने चौकशी करून सविस्तर व सुस्पष्ट
अहवाल पंधरा दिवसात सादर करावा असे आदेश उपोषणकर्त्यानी हे आंदोलन मागे घेतले.
0 टिप्पण्या