Ticker

6/Breaking/ticker-posts

गृहमंत्री शहांच्या दौर्‍याला आरोपींची अशीही सलामी..! एकच खळबळ..

  मोक्कतील ५ आरोपींचे राहुरी तुरुंगातून पलायन

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)


अहमदनगर : देशाचे गृहमंत्री अमित शहा नगर जिल्हा दौर्‍यावर असतानाच राहुरी येथील मोक्का गुन्ह्यामध्ये अटक असलेल्या   पाच आरोपींनी  खिडकीचे गज कापून जेलमधून पळ काढल्याने एकच खळबळ उडाली.

याबाबत मिळालेली माहिती अशी, नगर व पुणे ,नाशिक जिल्ह्यामध्ये खळबळ उडवून टाकणारे सागर भांड टोळीतील आरोपींना दरोडा प्रकरणात पोलिसांनी शिताफीने पकडले होते. यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर झालेला सागर भांड व त्याच्या साथीदारांनी अनेक ठिकाणी दरोडे, चोरी, दहशत निर्माण करणे, गावठी कट्यांचा वापर करून सर्वसामान्यांना जेरीस आणने आदी प्रकार केल्याचे विविध पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातून समोर आले होते. अशा आरोपींना राहुरी पोलिस ठाण्यातील तुरूंगात ठेवण्यात आले होते.

दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भांड प्रकरणातील आरोपींनी पळून जाण्याचा प्लॅन आखला. जेलमध्ये पाठीमागिल बाजुला असलेल्या खिडकीचे गज कापण्यात आले. आरोपींनी रात्रीच जेलमधून पळ काढला. त्यामुळे  एकच खळबळ उडाली आहे. यातील सागर भांड टोळीतील नितिन  उर्फ सोन्या माळी यांच्यावर मोक्का अंतर्गत नुकतीच कारवाई करण्यातआलेली होती.

सिनेस्टाईल पाठलाग करून दोघांना पकडले

पाच जण लपून पळत असल्याचे रात्रीची गस्त घालणार्‍या पोलिसांच्या निदर्शनास आले.  तत्काळ सहायक पोलिस निरीक्षक तुषार धाकराव, पोलिस हवालदार आदिनाथ पाखरे, ,दीपक फुंदे, विकास साळवे, देविदास कोकाटे, रंगनाथ ताके, कोळगे यांनी पाणी टाकी परिसरात सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला.  सुमारे एक तास आरोपी पुढे आणि पोलीस त्यांचे मागे असा थरार सुरू होता. अखेर  सागर भांड, किरण आजबे या दोघाना पोलिसांना जेरबंद केले. तर रविंद्र उर्फ रवी पोपट लोंढे, नितीन उर्फ सोन्या मच्छिंद्र  माळी, जालिंदर सगळगिळे हे आरोपी फरार झाले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांनी  तपासाची सूत्रे फिरवीत नाकेबंदी केली आहे. गुहमंत्री शहा हे  आज नगर जिल्हा दौर्‍यावर असल्याने पोलिस प्रशासन व्यस्त होते. त्याचा गैरफायदा घेत  आरोपींनी पळून जाण्याची घटना घडली. त्यामुळे पोलिस दलापुढे आव्हान निर्माण झाले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या