लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
आरणगाव ( ता. नगर ) :- नगर तालुक्यातील आरणगाव येथे झेंडा लावण्यावरून दोन गटात जोरदार धुमश्चक्री उडाली. तुफान वादातून दगडफेक झालीl एक महिला जखमी झाल्याचेवृत्त आहे. गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती तणावपूर्ण आहे.
याबाबत मिळाली माहिती अशी की ,गावात एका गटाचे झेंडे लावलेले आहेत. शनिवारी चार डिसेंबरला दुसऱ्या एका गटाने एक झेंडा लावल्यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. नगर तालुका पोलिसांनी 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असल्यामुळे गावात शांतता राहावी या उद्देशाने दुसऱ्या गटाला झेंडा काढण्यास लावले होते. त्यावेळी तो झेंडा काढला होता. आज सात तारखेला दुसऱ्या गटाने मिरवणुकीने जात पुन्हा झेंडा लावण्याचा प्रयत्न केला असता पहिल्या गटांनी त्यांच्यावर दगडफेक केली. या दगडफेकीनंतर तरुणांची फ्री स्टाइल मारामारी झाली. यात काही तरुण किरकोळ जखमी झाले तर दगडफेकीत एक महिला जखमी झाल्याचे समजते. गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले असून घटना स्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावात सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे.
0 टिप्पण्या