Ticker

6/Breaking/ticker-posts

विद्यार्थ्यांनी IT द्वारे ज्ञान आद्ययावत करावे - डॉ. सर्जेराव निमसे

 राष्ट्रीय पाठशाळेत  कर्मयोगी कॉ.आबासाहेब काकडे यांना आदरांजली








लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर :  कॉ.आबासाहेब काकडे यांनी गरिबांना त्यावेळी एक वेगळा विचार करून प्रतिकूल परिस्थिती मध्ये शिक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला . व त्यामुळे स्थानिक पातळीवर शिक्षणाची सोय झाली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षण घेत असताना नवनवीन तंत्रज्ञान आत्यसात करावे. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपले ज्ञान अद्ययावत करावे.तीच आबासाहेबाना खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन माजी कुलगुरु डॉ. सर्जेराव निमसे यांनी केले.

राष्ट्रीय शिक्षण मंडळ संस्थेच्या वतीने कर्मयोगी आबासाहेब काकडे यांची 43 वी पुण्यतिथी  संस्थेचे राष्ट्रीय पाठशाळा प्राथमिक विभाग राष्ट्रीय पाठशाळा  माध्यमिक विभाग वस्तीगृह विभाग एन,एन सथ्था कॉलेज ऑफ फार्मसी य सथ्था फार्मसी कॉलेजच्या प्रांगणात साजरी करण्यात आली.यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून विखे-पाटील फाऊंडेशनचे विश्वस्त अॅड वसंतराव कापरे ,उपप्राचार्य प्राध्यापक बाळासाहेब सागडे सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह परदेशी उपस्थित होते.

समोर बसलेल्या फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी फार चांगले भविष्य आहे .भारत हा देश पुढील कालावधीमध्ये जगाचे फार्म हब' होऊ पाहत आहे. नवनवीन फार्मा उद्योग भारतात येत आहेत या क्षेत्रात या संशोधनाचा अनेक संधी आहेत .भारतीय सामाजिक उपक्रमातील एन.सी.एल भारत बायोटेक या कंपन्या आर्थिक अडचणीत सामना करत आहेत. त्यामुळेसंशोधनासाठी लागणारे भांडवल खाजगी कंपन्यांकडे उपलब्ध आहे. म्हणून खासगी कंपन्यांमध्ये फार्मसीच्या विद्यार्थ्यांना फार चांगला संधी आहे .त्यासाठी विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान व माहिती  करून घ्यावी. आपले ज्ञान अद्ययावत करावी.असे डॉ.निमसे यांनी सांगितले.

 अॅड वसंतराव कापरे यांनी कॉ.आबासाहेब काकडे यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की ,आबासाहेब काकडे यांनी शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी मोठा लढा उभा केला मुळा धरणाचे पाणी लाडजळगाव पर्यंत जावे व कोपरे धरण व्हावे जायकवाडी धरणातून ताजनापुर द्वारे शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळावे यासाठी मोठे जनआंदोलन आबासाहेब यांनी उभे केले होते. त्यातून ताजनापुर लिफ्ट योजनेसाठी तीन टीएमसी पाणी राखून ठेवण्यात आले. शेतीसाठी पाणी मिळावे तसेच गरिबांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी वस्तीगृह शाळा सुरू करून शैक्षणिक कार्य आबासाहेबांनी सुरू केले गरिबाचे वकील म्हणून ते जिल्ह्यामध्ये त्यांची ओळख होती.

याप्रसंगी उपप्राचार्य बाळासाहेब सागडे. विजयसिंह परदेशी यांची भाषणे झाली. बाबासाहेब बुधवंत यांनी आबासाहेबांच्या सहवासातील आठवणी सांगितल्या संस्थेचे विश्वस्त डॉ.मेहरनोस मेहता व सौ उज्वलाताई बनकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

कॉ. आबासाहेब काकडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेवगाव पाथर्डी तालुक्यातील नगर शहरात राहणाऱ्या मान्यवरांना एकत्रित निमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे शेवगाव पाथर्डी तालुक्यातील अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल चे मुख्याध्यापक जगन्नाथ बोडखे यांनी केले.कार्यक्रमाप्रसंगी एन.एन.सथ्था फार्मसी विभाग प्रमुख विकास गवळी यांनी शिक्षक प्रतिनिधी म्हणून भाषण केले तर कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांचे आभार प्रदर्शन  कॉलेजचे प्राचार्य विशाल पांडे यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश काथवटे,सौ सोनम कोठुळे,सौ.पल्लवी चेडे यांनी केली कार्यक्रमाप्रसंगी शरद राव साहेब,सुदाम बटुळे,राहुल मुथ्था ,आर्किटेक दत्तात्रेय शेळके ह.भ.प विश्वनाथ अण्णा राऊत महाराज,ह.भ.प शिवाजी महाराज गरड,डॉ मुथा, अण्णा इथापे , साहेबराव बोडखे बप्पासाहेब बोडखे,दादासाहेब लगड नगर शिक्षक बँकेचे दिलीप मुरदारे,शेळके मॅडम,श्रीमती शकुंतला शिंदे,सौ संगीता ओक प्राध्यापक अशोक बोरुडे,राजेंद्र पंडित, डॉक्टर राहुल पंडित,सुमित शिंदे कार्यक्रमाचे यासाठी सर्व विभागाचे शिक्षक कर्मचारी मुख्याध्यापिका शोभा जोशी बाबासाहेब लोंढे सतीश काळे प्रवीण ऊर्किडे, गणेश काटवटे रामनाथ घनवट,कविराज बोटे सुशील ननवरे आबासाहेब बेडके,संजय सकट,गणेश धोंडे अशोक चव्हाण,हेमलता जगताप,वैभव वाघ,विकास आहेराव, सुधीर परभणे गणेश, कर्डिले,कल्याणी औताडे, शर्मिला कुसकळ,अश्विनी जोशी, प्राची दिघे,शुभम खैरे, शुभम भोर,ऋतुजा शिंदे,विजय वाणी, सोपान उबाळे,योगेश वाघमोडे,तुकाराम विघ्नेइ त्यादी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले

 


  .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या