लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नेवासा/भेंडा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व जाती आणि धर्मातील
समाजाला प्रतिनिधित्व देणारा राजकीय
पक्ष आहे. शरद पवार साहेबांसारखे उत्तुंग आणि पितृतुल्य नेतृत्व
आपल्या पक्षाकडे आहे.त्यामुळे तालुका-गाव पातळीवर बूथ कमिट्या करून संगठण मजबूत
करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी
कामाला लागा असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा
मंत्री जयंतराव पाटील म्हणाले.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथे
राष्ट्रवादी परिवार संवाद पर्व अंतर्गत कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना ना.पाटील
बोलत होते. व्यासपिठावर माजी आ. नरेंद्र घुले पाटील ,माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर,जिल्हा
अध्यक्ष राजेंद्र फाळके,माजी आ.पांडुरंग अभंग, ॲड.देसाई देशमुख,डॉ.क्षितिज घुले पाटील,प्रताप ढाकणे,संदीप वरपे,संजय कोळगे,प्रा.सीताराम काकडे आदी उपस्थित होते.
ना.पाटील पुढे म्हणाले,मागील निवडणुकीत विधानसभेच्या
११४ जागा लढविल्या,त्यापैकी ५४
जागा मिळाल्या.पराभूत ६० जागांचे काय ? या ६० जागांवर
सुधारणा करण्यासाठी सर्व मतदार संघाचा दौरा करण्यात येत आहे.पवार साहेबांसारखे
उत्तुंग नेतृत्व पक्षाकडे असतांना ही पक्ष का वाढत नाही असा प्रश्न प्रत्येक
कार्यकर्त्याने आपल्या मनाला विचारून पक्षाचा विस्तार कसा वाढविता येईल यासाठी
प्रयत्न करावेत.भले कोणी कोणाशी ही आघाडी करू,आपण त्याला मदत
करू परंतु आपले सैन्य आणि आपली यंत्रणा तयार ठेवा,गाफील राहू
नका.
राज्यात सरकार येऊन दीड पावणे दोन
वर्षे झाले,बराच कालावधी कोरोनाचे
संकटात गेला,सरकारच्या तिजोरीत पैसे येणे बंद झाले तरी ही
सरकारने शेतकऱ्यांचे दोन लाखा पर्यंतची कर्ज माफी केली.आता निसर्गाची अवकृपा होत
आहे.अतिवृष्टीचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो.त्याचे एक पीक वाया गेले तर
त्याचे सर्व बजेट बिघडते.अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून
सरकार लवकरात लवकर योग्य ती मदत करेल असे ही ना.पाटील यांनी सांगितले.
यावेळी माजी आ.नरेंद्र घुले पाटील,माजी आ. पांडुरंग अभंग, तालुका
अध्यक्ष काशीनाथ नवले आदींची भाषणे झाली.तुकाराम मिसाळ,अशोक
चौधरी, गफूरभाई बागवान,महिला तालुका
अध्यक्षा संगीता गव्हाणे,युवती अध्यक्षा दीपा गायकवाड,भीमराज शेंडे,अशोकराव मिसाळ आदींसह नेवासा , शेवगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे
पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या