Ticker

6/Breaking/ticker-posts

कोरोनाच्या निबंर्धानंतर मिडसागंवी येथे प्रथमच ग्रामसभा

 



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

खरवंडी कासार  : कोरोना आजाराच्या साथी नतंर दोन वर्षानी मिडसागंवी ता . पाथर्डी येथे प्रथमच सरपंच मुक्ताबाई हजारे यांच्या अध्यक्षतेखाली  व उपसरपंच विष्णु थोरात व  सर्व ग्रामपंचायत सदस्य जेष्ठ ग्रामस्थ युवक यांच्या उपस्थितीमध्ये  ग्रामसभा झाली आणि गावातील विविध प्रश्णावर यामध्ये चर्चा झाली .

गावाचा गावगाडा सुरळीत पणे चलण्यासाठी  गावाच्या विविध प्रश्णासदंर्भात चर्चा करणे व त्या प्रश्णाची सोडवणुक होण्यासाठी पंचायत राज व्यवस्थेमध्ये  ग्रामसभेचे मोठे महत्व आहे . परंतु गेल्या दोन वर्षा पुर्वी कोरोनाच्या वैश्चिक महामारी मुळे ग्रामसभेवर निर्बध आले कोरोना साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणुन गावा गावात ग्रामसभेला ही बंदी होती त्यमुळे गेल्या दोन वर्षात ग्रामसभा झाल्या नाहीत मात्र आता कोरोनाच्या रुग्ण सख्यांमध्ये  घट झाल्यानतंर लॉकडाऊन सपंले अनलॉक झाले शासन निर्बध शिथिल झाल्याने शासनाने गावात ग्रामसभा घेण्यास परवानगी दिली त्यामुळे आता पुन्हा ग्रामसभा सुरू झाल्या असुन गावाच्या विविध प्रलंबित प्रश्णावर चर्चा होऊ लागल्या आहेत .

 मिडसागंवी येथे मागील वर्षी ग्रामपंचायत निवडणुक झाली असल्याने ग्रामपंचायतच्या  नवीन कार्यकारी मडंळाच्या कार्यकाळातील हि पहिली ग्रामसभा झाली यामध्ये आमचा गाव आमचा विकास उपक्रमाअतंर्गत सण २२ / २३चा विकास आरखडा तयार करणे . शासन परिपत्रकाच्या मागदर्शक सुचनाचे वाचन करणे कोव्हिडचे नियमाचे पालन करून गावातील ५ ते १२ शाळेचे वर्ग भरण्यास परवानगी देणे गावातील कुपोषित मुलाचा आढावा घेऊन त्यांना औषध व अतिरिक्त पोषण आहार देणे जलजिवन मिशन यशस्वी होण्यासाठी जनजागृती करणे घरकुल पप्रत्र ड  यादी मधील लाभार्थाची प्रतिक्षा यादी तयार करणे १५ व्या वित्त आयोगाच्या मजुंर काम चालु करण्यास परवानगी देणे आदी विषयावर ग्रामसभेत चर्चा झाली .

यावेळी चर्चेमध्ये गावातील युवक व जेष्ठानी सहभाग घेत गाव विकासावर चर्चा केली ग्रामविकास अधिकारी एकनाथ आधंळे यांनी सभेचे सचिव म्हणुन काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या