Ticker

6/Breaking/ticker-posts

पाथर्डीत परस्परांविरुद्ध बलात्कार व खंड्णीचा गुन्हा ; तालुक्यात खळबळ

 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

पाथर्डी : पाथर्डी बाजार समितीच्या उपसभापतीच्या पतीविरुद्ध एका महिलेने बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केल्याने तालुक्यात एकच खळबळी उडाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमधे भुखंड पाहीजे असेल तर तुला माझ्याशी शारीरीक संबध ठेवावे लागतील असे सांगुन प्राथमिक शिक्षक असलेल्या आणि बाजार समितीच्या उपसभापतीचे  पती राजेंद्र विलास गर्जे रा.पागोरीपिंपळगाव यांच्या विरुद्ध बलात्कार केल्याप्रकरणी एका महिलेने गुन्हा नोंदवला आहे. 

 दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुखंड वाटपाबाबत वृत्तपत्रातील जाहीरात वाचुन कोल्हार येथील महीलेने भुखंड मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.अर्जावर दिलेल्या फोननंबरवर पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीच्या पतीने म्हणजेच राजेंद्र विलास गर्जे यांने फोन केला. माझी बायको बाजार समितीची उपसभापती आहे. तुला भुखंड पाहीजे असेल तर मला भेट असे सांगितले. महीला पाथर्डीत आली तेव्हा राजेंद्र गर्जे याने तिला दिनांक १८ आँगस्ट २०२१ रोजी पावणेतीन वाजता अर्जुना लाँन्सजवळीत गाळ्यात नेले. गाळ्याचे शटर बंद करुन

 तेथे तिला विविस्त्र करुन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर झालेल्या प्रकाराबाबत  कोठे काही बोललीस तर तुला जिवे ठार मारीन अशी धमकी दिली.
त्यानंतर सदर महीला तिच्या गावी गेली. पुन्हा २२ आँगस्ट २०२१ रोजी सकाळी अकरा वाजता  महीलेच्या कोल्हार येथे जाऊन तिच्या घरात तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. महीलेने घडलेला प्रकार तिच्या पतीला सांगितला. पतीने धीर दिल्यानंतर  महीलेने पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी राजेंद्र गर्जे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे तपास करीत आहेत. 

 दरम्यान राजेंद्र गर्जे याने सदर महीलेविरु्द व गोरक्ष पांडुरंग ढाकणे यांच्या विरुद्ध दहा लाख रुपये खंडणी मागीतल्याचीतक्रार नोंदविली आहे. फोनवर झालेल्या बोलण्याचे रेकाँर्डींग करुन बाजार समितीमधे भुखंड दे नाहीतर दहा लाख रुपये दे असे सांगुन महीलेने व ढाकणे याने दहा लाख रुपयाची खंडणी मागितली असल्याचे राजेंद्र गर्जे याचेम्ह्णणे आहे. पोलिसांनी महीला व ढाकणे याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.  या परस्पर विरोधी गुन्हा प्रकरणाचा गुंता वाढ्ला असुन या प्रकरणाचा टिव्स्ट चर्चेत आहे.

 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या