लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
श्री
क्षेत्र मोहटादेवी गड: [ ता. पाथर्डी ]-
मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रउत्सवा निमित्त देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा
जिल्हा न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर सौ.आरती कुर्तडीकर यांच्या हस्ते
मंत्र्रोपचाराच्या जयघोषात घटस्थापना करण्यात आली.
यावेळी
विश्वस्त डॉ.
ज्ञानेश्वर दराडे,अशोक विक्रम दहिफळे,अशोक
भगवान दहिफळे,अजिनाथ आव्हाड, भीमराव
पालवे देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे,भीमराव
खाडे, संदीप घुले आदीं उपस्थित होते. कोरोना निर्बंधामुळे भाविकांना दर्शनासाठी ऑनलाईन पासव्दारे सुविधा दिली असून प्रती दिवस पाच
हजार भाविक दर्शन घेऊ शकतील. पास नसलेल्या हजारों भाविकांनी घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी पहाटेपासून मंदीर कळसाचे दर्शन घेतले.
पाथर्डी
शहरापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर उंच डोंगरावर मोहटादेवीचे स्वयंभू स्थान
आहे .देवस्थान समितीने लोकवर्गणीतून कोट्यावधी रुपये खर्चून भव्य मंदिर उभारले आहे
. देशातील देवी मंदिरापैकी सर्वात मोठे व आकर्षक मंदिर असून या मंदिराची रचना श्री
यंत्रकार आहे नवसाला पावणारी देवी म्हणून मोहटादेवीची ख्याती
आहे. देवीच्या साडेतीन शक्ती
पिठांपैकी श्री क्षेत्र माहुरचे उपपीठ म्हणून मोहटा देवस्थानची ख्याती आहे.चौंसष्ट
योगिनी,अष्ट
भैरव,व दश महाविद्यांच्या मूर्ती श्री यंत्राकार दर्शन
रांगेत स्थापित मोठे भव्यदिव्य मंदीर आहे.
काल
सकाळी मोहटे गावातून देवीच्या सुवर्णालंकारासह मुखवटा वाहनातून गडावर आण्यात आला.
गावात मोहटा देवीच्या मुखवटा दर्शनासाठी स्थानिक व परिसरातील महिला भाविक सहभागी
झाल्या होत्या.काही वेळातच देवस्थान समितीने मुखवटा वाहनातून गडावर आणला.विवेक
मुळे, भूषण
साकरे, बाळासाहेब क्षिरसागर, नारायण
सुलाखे आदींनी वेदमंत्रांच्या जयघोषात घटस्थापना केली.
0 टिप्पण्या