लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
जामखेड
: मुलाच्या कर्तुत्वाने
माझा सन्मान होत असल्याने मला
आभिमान असल्याची भावना आमदार रोहित पवार यांच्या
मातोश्री सुनंदाताई पवार सुनंदा पवार यानी व्यक्त केली. तालुक्यातील
देवदैठण येथे त्याच्या पेढे तुला कार्यक्रमाच्या वेळी बोलत होत्या. यावेळी सुनंदा
पवार याना बोलताना गहिवरून आले. पंचायत समिती सभापती राजश्री मोरे व सुर्यकांत
मोरे दाम्पत्याने सुनंदाताईची पेढेतुला केली.
यावेळी
सभापती मोरे दाम्पत्य , माजी
सभापती सुभाष आव्हाड , माजी पं.स.सदस्य विजयसिंह गोलेकर ,
कैलास महाराज भोरे , सरपंच हर्षा महानवर ,
उपसरपंच अनिल भोरे , मनोज भोरे , अशोक धेंडे , देवदैठन सेवा संस्थेचे अध्यक्ष महादेव
भोरे , बापुसाहेब शिंदे , बजरंग भोरे ,
शैलेंद्र मोरे , चरण कदम , नितीन ग्रामस्थ उपस्थित होते.
बोलताना
सुनंदाताई पवार म्हणाल्या , पंचायत समिती सभापती मोरे व
सूर्यकांत मोरे या दाम्पत्यांनी माझी पेढेतुला कार्यक्रम करण्याचा प्रस्ताव
माझ्यापर्यंत पोहचला . तो माझ्या स्वभावाच्या पूर्ण विरोधात होता. पण मला
त्यांच्या भावनाचा आदर करायचा होता म्हणून मी दोन पावले माघारी घेतले.
रोहीत पवार या भागात येणे व आम्ही
दोघांनी त्याला परवानगी देणे , माझे स्वतःचे कुटुंब कोणीच
राजकारणात नव्हते . माझ्या सास - यापासून आम्ही समाजसेवेत होतो . राजकारण विषय
कधीच नव्हता जे आहे ते मूळ स्वभावातच आहे. असे सुनंदा
पवार यांनी भावना व्यक्त केल्या.
0 टिप्पण्या