लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवगाव: शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे
केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चालू वर्षीच्या गळीत हंगामा चा शुभारंभ
सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचे हस्ते करण्यात येणार
असल्याची माहीती कारखाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्वीनीकुमार घोळवे व
प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे यांनी दिली.
तसेच याच दिवशी बॉयलर अग्नी प्रदिपन बुलढाणा अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटीचे विभागिय व्यवस्थापक प्रभाकर कोलते यांचे हस्ते होणार आहे. महासांगवी येथील मिराबाई संस्थानच्या मठाधिपती हभप राधाताई सानप, चार्टड अकौंटंट मयुर बंब , तज्ज्ञ संचालक ऋषिकेश ढाकणे यांची प्रमुख उपस्थीतीआहे.
माजी सभापती सौ.
मंगलताई काटे, आणी संचालक माधव काटे यांचे हस्ते बॉयलर ची
विधीवत पुजा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ॲड. प्रतापराव ढाकणे यांचे अध्यक्षतेखाली
होणार आहे. तरी सर्व सभासद ,शेतकरी , यांनी
कार्यक्रमास उपस्थीत राहण्याचे आवाहन मुख्य प्रशासन अधिकारी पोपट केदार यांनी
केलेआहे.
0 टिप्पण्या