लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पाथर्डी: अहमदनगर जिल्ह्यात विशेषत: शेवगाव पाथर्डी तालुक्यात अतिवृष्टी व
पुरामुळे व दररोज होणाऱ्या पावसामुळे हजारो एकरावरील पिके वाया गेली. शेतात
पुराचे पाणी शिरून शेती वाहून गेली, वाड्या-वस्त्यावरील घरात व शहरात पाणी शिरून
संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडेलत्ते
यांचे नुकसान झाले. डोळ्यादेखत हजारो जनावरे पुरात वाहून गेली व मृत पावली. त्यामुळे
शेतकरी व नागरिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. यासाठी सरकारने ओला दुष्काळ जाहिर करुन
सरसकट मदत तात्काळ देण्याची मागणी आमदार मोनिका राजळे यानी मुख्यमंत्र्यांकडे केली
आहे.
शेतकरी व सर्वसामान्यांचा कळवळा दाखवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टी व पुराच्या संकटात सापडलेला असताना शेतकऱ्यांप्रति, नुकसानग्रस्त नुक्संग्रस्ताप्रती, थोड्यातरी संवेदना जाग्या ठेवून या नुकसानग्रस्तांना मदत करणे आवश्यक आहे. अतिवृष्टीमुळे गेल्या दीड महिन्यापासून नुकसान होत आहे, अनेक नेत्यांनी, मंत्र्यांनी, अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाला भेटी दिल्या पण अजूनही मदत मिळत नाही मग हे दौरे केले कशासाठी ? अहमदनगर जिल्ह्यात पालकमंत्र्यांसह चार मंत्री आहेत परंतु या मंत्री महोदयांना अहमदनगर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्तांच्या सवेदना जाणवत नाहीत काय ? शेतकऱ्यांच्या पिकांचे 100 % नुकसान झालेले आहे. अनेक घरांची, व्यवसायिकांची पुराच्या पाण्यामुळे पडझड व नुकसान झालेले आहे. नुकसानग्रस्त आशाळभूत नजरेने शासनाच्या मदतीची अपेक्षा ठेवुन आहेत. परंतु असंवेदनशील शासनाने अद्याप पर्यंत एकही रुपयांची मदत जाहीर केली नाही.
0 टिप्पण्या