लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर: जिल्ह्यातील महामार्गांचे भूमिपूजन व
लोकार्पण सोहळ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज थेट पारनेरचे
आमदार नीलेश लंके यांच्या घरी जाऊन त्यांचा पाहुणचार घेतला. पवार यानी लंके
यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन तिथं जमलेल्या कार्यकर्त्यांचीही विचारपूस केली. पारनेर
दौऱ्यावर असलेले सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व कर्जत-जामखेडचे आमदार रोहित
पवार हे देखील शरद पवार यांच्या पाठोपाठ लंके यांच्या घरी पोहोचले. त्यामुळे
लंके यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. या भेटीमुळं नीलेश लंके
यांचं राजकीय वजन आणखी वाढल्याची चर्चा आहे.
त्यांच्या
याच कामाची पोचपावती आज त्यांना मिळाली. शरद पवार हे स्वत: लंके यांच्या घरी गेले.
लंके यांच्या दोन खोल्याच्या घरात त्यावेळी बरीच गर्दी झाली होती. लंके यांचे वडील
ज्ञानदेव लंके गुरुजी व आई शंकुतला यांनी पवारांचं स्वागत केलं. लंके यांनी
तालुक्यातील कार्यकर्त्यांची पवारांशी भेट घालून दिली. पारनेर दौऱ्यावर असलेले
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे देखील शरद
पवार यांच्या पाठोपाठ लंके यांच्या घरी पोहोचले.
0 टिप्पण्या