लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर: पुढील वर्षी कोरोनाचे संकट टळलेले असेल, त्यावेळेस
नक्कीच नगर शहरात तुळजाभवानी देवीच्या पलंगाचेआगमन झाल्यावर मानाचे पहिले पलंगाचे स्वागत प्रशासन व लोकप्रतिनिधी कडून केले जाईल असे आश्वासन आ
संग्राम जगताप यांनी दिले.
आ संग्राम जगताप यांनी नगर शहरातील सबजेल
चौकातील तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये तुळजाभवानी देवीची व आगमन झालेल्या
पलंगाची पूजा केली यावेळी. यावेळी
मंदिराचे पुजारी बाबूराव,गणेश,अनंत व उमेश पलंगे,साहेबराव पाचारणे उपस्थित होते.
गणेश पलंगे यांनी पलंगाची माहिती देऊन
तुळजापूरला कसा मान असतो हे सांगितले,पलंगाचे तुळजापूरला आगमन झाल्यावर प्रथम
जिल्हाधिकारी,लोकप्रतिनिधी मानाची पूजा व
स्वागत करतात तसे आपल्या शहरात पण व्हावे व ते दरवर्षी करत जावे अशी मागणी
भाविकांची असल्याचे त्यानी सांगितले. त्यावर आ. जगताप यानी
त्याना आश्वस्त केले. यावेळी त्यांनी दर्शनाची केलेल्या
नियोजनाची पाहणी केली.
0 टिप्पण्या