Ticker

6/Breaking/ticker-posts

तुळजाभवानी देवी पलंगाच्या प्रवासाला परवानगी देण्याची भाविकांची मागणी

 









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अ. नगर: घोडेगाव ते तुळजापूर पर्यंतच्या तुळजाभवानीच्या पलंग प्रवासाची परंपरा तेराव्या शतका पासून अव्याहत सुरू आहे.मागील वर्षी कोरोनामुळे हि प्रथा खंडित झाली होती,पुणे मार्गे पलंग थेट तुळजापूरला नेण्यात आला होता परंतु यावर्षी दि ७ ऑक्टो. पासून शासनाने  मंदिरे उघडण्यास परवानगी दिली असल्याने पलंग प्रवासास-मिरवणुकीस परवानगी मिळावी अशी अनेक भाविकांची मागणी आहे.

दळणवळणाची कोणतीही साधने नसण्याच्या कालखंडापासून भवानी मातेच्या पलंगाच्या प्रवासाची परिक्रमा सुरू आहे. 

गणेशोत्सव काळात पलंगाचा मुक्काम जुन्नरमध्ये असतो.तेथून नगरमार्गे नवरात्रोत्सव सुरू झाल्यावर तुळजापूरची भवानी मंदिरापर्यंत पलंगाचा प्रवास होतो परंतु मंदिरे बंद असल्याने हा तुळजाभवानी देवीचा पलंगाचे घोडेगाव(ता आंबेगाव,जिल्हा पुणे)येथेच आहे.

तुळजापुरकडे प्रस्थान अजून झाले नाही श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे मुख्य मानकरी पुजारी नगरचे बाबुराव पलंगे,गणेश पलंगे,अनंत पलंगे,उमेश पलंगे यांच्याकडे सरकारने मंदिरे उघडण्यास परवानगी दिल्याने हा प्रवास नागरपासून तरी दि ७ ऑक्टो पासून सुरु व्हावा अशी मागणी अनेक भाविकांनी केली आहे.

घोडेगाव ते नगर प्रवास झाला नाही,मंदिरे बंद असल्याने मुक्काम कोठे करावयाचा हा प्रश्न होता तसेच पलंग ५ जिल्ह्यातून जात असल्याने परवानगी कोठे मागायची हा प्रश्न होता तर दि २३ ला तुळजापूरला शासकीय मिटिंग झाली. त्यावेळेस मंदिरे उघडण्याची घोषणा झाली नव्हती,परंपरने हा प्रवास होत असल्याने आजपर्यंत कधी परवानगी घेण्यात आली नाही परंतु नागरपासून जरी हा प्रवास सुरु करावयाचा तर पुढे बीड,सोलापूर,उस्मानाबाद हे चार जिल्हे लागतात पण आता प्रत्येक जिल्हात प्रशासनाची परवानगी घेणे अवघड आहे त्यामुळे राज्य सरकारने या बाबत भूमिका स्पष्ट करावी व जिल्हातील लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घालावे,जर सरकारने परवानगी दिली तरच पलंग पुढे नेता येईल.  

तुळजाभवानी देवीचा पलंग घेऊन येण्याचा मान परंपरेने नगर शहरातील सबजेल चौकातील तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे पलंगे घराण्याला आहे.याबाबत माहिती देताना गणेश पलंगे म्हणाले तुळजाभवानी मातेच्या जयघोषात भाविक भक्तांच्या डोक्यांवर तर कधी हातावर उचलत पायी प्रवासाची १२ व्या शतकापासूनची परंपरा असलेल्या तुळजापूरच्या भवानी मातेच्या पलंग सोहळा करोनाच्या संकटामुळे मागील ८०० वर्षात प्रथमच मागील वर्षी खंडीत झाला.एवढ्या प्रदीर्घ काळाचा पलंगाचा हा प्रवास अनेक संकटे झेलत अव्ह्यायतपणे सुरू राहिल्याचे पुर्वज सांगतात तर यावर्षी करोनाच्या संकटाने पलंगाच्या अखंडीत चाललेल्या परंपरेला बाधा पोहचली आहे. 

            

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या