लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नवी दिल्ली : WhatsApp
यूजर्सचा चॅटिंग अनुभव अधिक शानदार करण्यासाठी नवनवीन फीचर्स आणत
असते. व्हॉट्सअॅपमध्ये असंख्य फीचर्स आहेत. आता या प्लॅटफॉर्मवर काही नवीन
फीचर्सचा समावेश होणार आहे. यात लास्ट सिन, नवीन डिसअपेरिंग फीचर्स आणि ग्रुप
इंफो पेजला रिडिझाइनचा समावेश आहे. सोबतच, यूजर्सला हाय रिझॉल्यूशनचे फोटो व व्हीडिओ पाठवता येणार आहे. WABetaInfo
ने या फीचर्सची माहिती दिली
आहे. सध्या या फीचर्सचे टेस्टिंग सुरू आहे.
लास्ट सीन
डिसअपेरिंग चॅट्स
यूजर्सला लवकरच नवीन डिसअपेरिंग चॅट्स फीचर मिळणार आहे. हा मोड वन एंड वन आणि ग्रुप चॅट्सवर लागू असेल. हे डिसअपेअरिंग मेसेजचे अपडेटेड व्हर्जन असेल. हे फीचर प्रायव्हसी सेटिंग्समध्ये मिळेल. फीचर एनेबल केल्यावर पाठवलेले मेसेज काही वेळानंतर आपोआप डिलीट होतील.
ग्रुप आयकॉन
एडिटर आणि रिडिजाइन ग्रुप इंफो
व्हॉट्सअॅप नवीन ग्रुप आयकॉन एडिटर फीचरवर काम करत
आहे. या फीचरला अँड्राइड बीटा व्हर्जन २.२१.२०.२ वर पाहण्यात आले आहे. याद्वारे
यूजर्सला ग्रुपसाठी आयकॉन तयार करता येईल व कोणत्याही फोटोची गरज नसेल. सोबतच, बॅकग्राउंड कलर देखील निवडता येईल. यात इमोजी व
स्टिकरचा देखील पर्याय मिळेल. तसेच, चॅट्ससाठी मोठा आयकॉन
मिळू शकतो.
व्हॉट्सअॅप मोठ्या आकाराच्या व्हीडिओ आणि फोटोला कंप्रेस करते. जेणेकरून, कमी इंटरनेटमध्ये फाइल सहज सेंड होईल. मात्र, अनेकदा यूजर्सला हाय रिझॉल्यूशनमध्ये फोटो व व्हीडिओ पाठवायचे असतात. अशावेळी यूजर्स टेलिग्रामची मदत घेतात. व्हॉट्सअॅप लवकरच एक नवीन फीचर आणणार आहे, ज्याच्या मदतीने हाय रिझॉल्यूशन व्हीडिओ आणि फोटो पाठवता येतील.
स्टिकर इमेज
एखादा सण अथवा खास दिवशी यूजर्स लेटेस्ट व
हटके स्टिकर्स डाउनलोड करतात. मात्र, नवीन फीचरमुळे यूजर्स कोणत्याही फोटोला स्टिकरमध्ये बदलू शकतील. हे नवीन
फीचर कॅप्शन बारमध्ये दिसेल, जे फोटोला सेंड करताना दिसत
आहे. या फीचरचे टेस्टिंग सुरू असून, २.२१३७.३ बीटा व्हर्जनवर
पाहण्यात आले आहे.
0 टिप्पण्या