:
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
शेवंगाव: मातीतल्या माणसांनी लिहिलेले साहित्य सर्वदुर पोहचण्यासाठी शब्दगंधच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतात,त्यासाठी नवोदितांनी शब्दगंध मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने शेवंगाव तालुक्यातील नवोदित साहित्यिकांची महत्वपूर्ण बैठक शनिवारी दुपारी पार पडली,त्यावेळी ते बोलत होते.संस्थापक सुनील गोसावी, प्रा.डॉ.अशोक कानडे,शाहीर वसंत डंबाळे,विठ्ठल सोनवणे इ मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री.उदागे म्हणाले कि, "सामाजिक परिवर्तना मध्ये साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची असते,पण दूरस्थ माध्यमामुळे माणसं माणसापासुन दुर जात आहेत,ती मनाने एकत्र येण्यासाठी विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे."
यावेळी विठ्ठल सोनवणे यांनी शेवंगाव तालुक्यातील नवीन लिहिणा-यांची माहिती दिली.
शरद तुपविहिरे, बाळासाहेब भागवत,अभिजित नजन,मोहन उदागे यांच्यासह तालुक्यातील नवोदित लेखक, कवी,साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यरत व्यक्ती उपस्थित होते.
0 टिप्पण्या