लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
अहमदनगर: येथील दबंग सामाजिक कार्यकर्त्या मंगल भुजबळ यांची राज्य माळी संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र नुकतेच संघाचे प्रमुख भानुदास माळी यांनी दिले आहे.
मंगल भुजबळ यांचे नगर जिल्ह्यातील महिलांचे संघटन, ओबीसी समाज संघटना व जागृती सेवाभावी संस्थेसह विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाची दाखल घेत माळी महासंघाने त्यांना राज्यस्तरावरील जबाबदारी दिली आहे.
त्यांच्या या अनुभवाचा माळी समाजातील महिलांचे संघटन घडवून सक्षमी करणासाठी फायदा होईल अशी अपेक्षा माळी यांनी व्यक्त केली. या निवडीबद्दल भुजबळ यांचे अभिनंदन होत आहे.
0 टिप्पण्या