लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नवी दिल्ली: विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माकडे वनडे आणि टी-२० संघाचे
कर्णधारपद द्यावे अशी मागणी मोठ्या कालावधीपासून चाहते आणि काही माजी क्रिकेटपटू
करत आहेत. २०१९च्या वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर ही मागणी जोरदार
करण्यात आली. पण त्यानंतर ती पुन्हा मागे पडली. बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्या
वेळी यावर गंभीरपणे विचार करण्यास सुरूवात केली. विराट कोहली तेव्हा मुलीच्या जन्मासाठी भारतात
आला होता आणि कसोटी संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे देण्यात आले होते.
ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिका
जिंकल्यानंतर अजिंक्यला कसोटीचे कर्णधारपद देण्याची मागणी झाली. पण बोर्डाने
त्याकडे लक्ष दिले नाही. मर्यादित षटकाच्या कर्णधारपदाबाबत बीसीसीआय, विराट कोहली रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापन यांच्यात चर्चा सुरू होती. आता टी-२० वर्ल्डकपनंतर
मर्यादित षटकाच्या संघाचे नेतृत्व रोहितकडे दिले जाण्याचे वृत्त समोर येत आहे.
गेल्या काही महिन्यात सुरू असलेल्या चर्चेचा हा परिणाम आहे. कर्णधारपद सोडण्याबाबत
विराट कोहली स्वत: घोषणा करू शकतो.
विराट आणि रोहित ही भारतीय क्रिकेटमधील दोन मोठी
नावे आहेत. या दोघांच्यात वाद असल्याच्या अनेक बातम्या याआधी आल्या आहेत. पण कधी
उघडपणे ही गोष्ट समोर आली नाही. करोनाच्या आधी अशा बातम्या आल्या होत्या. कोरना
नंतर पुन्हा क्रिकेट सुरू झाल्यावर सर्व खेळाडू एकत्र राहू लागले. याचा फायदा
विराट आणि रोहित यांना झाला. त्याच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला. ड्रेसिंग
रूमच्या आता आणि बाहेर विराट आणि रोहित अनेक वेळा एकत्र दिसले. मर्यादित षटकांच्या
क्रिकेटमध्ये रोहित शर्माचे नेतृत्व जबरदस्त असल्याचे विराट कोहलीने देखील मान्य
केले आहे. टाइम्स ऑफ इंडियाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहितला वनडे आणि
टी-२०चे नेतृत्व देण्याची यापेक्षा उत्तम वेळ नाही.
विराट कोहलीवर तिनही संघाच्या कर्णधारपदाचे ओझे
आहे. त्याचे वर्कलोड कमी करण्याचा प्रयत्न बीसीसीआयकडून सातत्याने सुरू आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मिळवलेल्या कसोटीतील विजयानंतर मर्यादित षटकाच्या
कर्णधारपदाबाबत गंभीरपणे चर्चा सुरू झाली होती. गेल्या काही महिन्यात विराट कोहली
देखील त्याच्या फलंदाजीबद्दल काळजीत दिसत होता. पुढील दोन वर्षात भारताला टी-२०
आणि वनडे वर्ल्डकप खेळायचा आहे. विराटला या दोन्ही स्पर्धेत महत्त्वाची भूमिका पार
पाडायची आहे. यासाठी फलंदाजी म्हणून जुन्या लयीमध्ये येणे गरजेचे आहे.
कोहलीच्या जागी रोहित हा सर्वोत्तम पर्याय आहे.
रोहित ३४ वर्षाचा आहे आणि सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत
आहे. तो संघात दुसऱ्या क्रमांकावर आहे. टी-२० मधील कर्णधार म्हणून त्याचे रेकॉर्ड
शानदार आहे. पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळून दिले आहे. या शिवाय सलामीवीर म्हणून
तो जगात अव्वल स्थानावर आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विराट आणि रोहितची
तुलना केल्यास हिटमॅनची कामगिरी सरस दिसते. वनडे, टी-२० आणि आयपीएलमध्ये रोहित हा विराट पेक्षा उत्तम दिसतो.
बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितल्यानुसार कर्णधार
बदलण्याबाबतच्या वृत्ताला फार मोठे केले जाणार याची कल्पना आहे. त्यामुळेच
बोर्डाने फार आधीपासून याची तयारी सुरू केली आहे. नेतृत्व बदल करण्याबाबत विराट
आणि रोहित यांचे एकमत आहे.
0 टिप्पण्या