लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर: सतत 23 वर्षेगणेशोत्सवात
उत्साहात साजरा होणारा महानगरीचा महाउत्सव म्हणून ख्याती पावलेला नगरचा सर्वात
मोठा सांस्कृतिक सोहळा यावर्षीही होणार नाही कार्यक्रमापेक्षा लोकांचे जीव
महत्वाचे आहेत .. मात्र कोरोनाची साथ ओसरल्यावर आधीच जाहीर केलेला स्व प्रदीप
गांधी कोहिनूर पर्यटन महोत्सव अतिशय वेगळ्या आणी नावीन्यपूर्ण पद्धतीने संपन्न
होइल अशी माहिती नगर महोत्सवाचे मुख्य सयोजक सुधीर
मेहता यानी दिली.
जिल्हाधिकारी विजयकुमार आणी पोलीसप्रमुख हिमांशु राय असताना त्यांच्या
पुढाकाराने नगर व्यासपीठ आणी युवक बिरादरी यांच्या वतीने गणेशोस्तवात दर्जेदार
अभिरुचिसंपन्न कार्यक्रम व्हावेत ... नगरच्या कलाकाराना व्यासपीठ प्रोत्साहन
मिळावे .. नगरच्या पर्यटनाला चालना मिळावी यासाथी दहा
दिवसांचा नगर महोत्सव सुरु झाला 40 विविध कार्यक्रम नगर
महोत्सवात होत असत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, क्रीडा, सांस्कृतिक, संस्कारांच्या
सहभागाने हा सांस्कृतिक क्षेत्रातील मोठा सोहळा झाला हजारो विद्यार्थी कलाकारांना या
संगीत नृत्य कला क्रीडा सोहळ्यातुन हक्काचे व्यासपीठ मिळाले. मात्र मागील दोन
वर्षेकोरोना मुळे महोत्सव झाला नाही महोत्स महिला आणि विद्यार्थ्यांचा असतो
कोरोनाची तिसरी लाट पहाता महोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय नाइलाजाने घेण्यात आला.
नगर भूषण आणि स्व गोपाळराव मिरिकर पत्रकारिता पुरस्कार ही देता आले नाहीत,
याबद्दल खेद व्यक्त करुन मात्र हे संकट टळताच हे पुरस्कार
वितरण आणी भूईकोट किल्ला महोत्सव चांदबिबी महोत्सव असा पर्यटन
महोत्सव स्व प्रदीप्शेठ गांधी यांच्या संकल्पनेनुसार होणार असल्याचे सुधीर मेहता
यानी स्पष्ट केले.
या
पर्यटन महोत्सव सयोजन समीती आणी कार्यक्रमात सहभागी
हौउ इछिणार्यांनी आपली नावे नोंदवावीत ज्याना कार्यक्रमात सादरीकरण करावयाचे असेल
त्यानी प्रत्यक्ष संपर्क साधावा असे आवाहन सुधीर मेहता यांनी केले आहे. अधिक
माहितीसाठी मो 9423793365,9423793375 या नंबरवर संपर्क
साधावा.
0 टिप्पण्या