Ticker

6/Breaking/ticker-posts

महासांगवी प्रकल्प भरल्याने साकत परिसराचा पाणीप्रश्न मिटला; शेतकऱ्यांत समाधान



 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

साकत : जामखेड तालुक्याच्या डोंगरभागात असलेल्या साकत ,कडभनवाडी पिंपळवाडी , कोल्हेवाडी यथील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीचा प्रश्न सोडविणारा महासांगवी तलाव पुर्ण  क्षमतेने भरून वाहू लागल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.

 

साकत गावाच्या पूर्वेस जामखेड व पाटोदा  तालुक्याच्या सरहद्दीवर  1965 साली मांजरा नदीवर महासांगवी तलाव बांधण्यात आला या तलावासाठी साकत , कडबनवाडी ,महासांगवी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या या तलावाची पाणी साठवण क्षमता 6.74 दशलक्ष घनमीटर असली तरी हा तलाव फार जुना असल्याने या तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ साठून तलावाची पाणी साठवण क्षमता कमी झाली होती मात्र या तलावातील पाण्यावर साकत , कडबनवाडी या जामखेड तालुक्यातील शेतकरी अवलंबून असते तरी पाटोदा तालुक्यातील पाटोदा शहरातील नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा व पाटोदा , पारगाव , अनपटवडी सह अन्य गावाचा पिण्यासाठी व शेतीसाठी वापर होतो.

 

 त्यामुळे माजी मंत्री सुरेश आण्णा  धस यांनी 7 वर्षांपूर्वी या तलावातील संपूर्ण गाळ शासकीय योजनेतुन बीड जिल्हा परिषद माजी सभापती महेंद्र गर्जे या निष्ठावान कार्याकत्या मार्फत तसेच साकतच्या शेतकऱ्यांनी शासनाची मदत न घेता  गाळ  काढल्याने या तलावाची साठवण क्षमता पुन्हा पूर्ववत झाल्याने साकत परिसरातील नागरिकांच्या पिण्याचा व शेतीचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे अनेक वर्षानंतर हा तलाव पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागल्याने शेतकरी समाधानी झाले आहेत कारण हकेच्या अंतरावर असल्याने गावातील विहिरी व कूपनलिका  उन्हाळ्यात पाणी  राहाते.

 

महासांगवी सिंचन प्रकल्प बीड जिल्ह्यातील  पाटोदा तालुक्यात येत असला तरी डोगरपठार परिसरासाठी वरदान  महासांगवी सिंचन प्रकल्प भरून वाहू लागल्याने मांजरा नदी सध्या वाहत आहे मांजरा नदी जामखेड तालुक्यातील दिघोळ , जातेगांव शिवारातुन जात असल्याने  त्या परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होत. महासांगवी सिंचन प्रकल्पातुन गाळ उपसा केला त्यामुळे तलावाची पाणी पातळी वाढली व शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनी सुपिक झाल्या आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या