लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
नगर
: कार्यक्रमांमध्ये
राज्याचे मुख्यमंत्री काय म्हणाले हे अगोदर त्यांना विचारलं पाहिजे,आज भाजपमध्ये नैराश्याचे वातावरण
आहे भाजप मधील अनेक जण ते महाविकासआघाडी मध्ये येण्यास तयार आहेत ते आल्यानंतर
भविष्यामध्ये ते भावी सहकारी होऊ शकतात असे वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री
बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रकारांशी बोलताना केले .
नगर
येथे नूतन शासकीय इमारतीची पाहणीसाठी आले असता त्यावेळी ते बोलत होते . आमदार लहू
कानडे, अशोक
भांगरे नागिन सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ना. थोरात म्हणाली की, सध्या भाजप मध्ये नैराश्याचं वातावरण आहे ,महा विकास
आघाडीचे सरकार दोन वर्ष राज्यांमध्ये आपला कार्यकाळ पूर्ण करत आहे, आणि आगामी तीन वर्षेही सरकार पूर्ण करणार आहे.
आज
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे वक्तव्य केलेले आहे यासंदर्भात अगोदर
त्यांना विचारले पाहिजे, पण
दुसरीकडे भाजपात नैराश्य असल्यामुळे आज अनेक जण महाविकास आघाडीतील शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी
यांच्याकडे येणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे, ज्यावेळेस
ते येतील त्या वेळेला ते भावी सहकारी होतात असे ते म्हणाले.
यावेळी
नामदार थोरात म्हणाले की, राज्यामध्ये
पावसाने अतिवृष्टी झाली आहे अजून पंचनामे होणे बाकी आहे, पाथर्डी
शेवगाव या दोन तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे
नुकसान झाले आहे, मात्र यासंदर्भात सर्व विषयांची
कॅबिनेटमध्ये चर्चा केली जाणार असून लवकरच त्यबाबतचा निर्णय घेतला जाईल असेही ते
यावेळी म्हणाले.
पेट्रोल
व डिझेल हे जी एस टी मध्ये आणण्यासाठी
चर्चा सुरू आहे त्याचा राज्यावर काय परिणाम होईल असे विचारल्यावर थोरात यांनी
अगोदर जीएसटी मध्ये आल्यावर किती फायदा आहे व किती तोटा आहे याचा अभ्यास
झाल्यानंतर त्यावर बोलणे उचित होईल असेही ते म्हणाले.
जीएसटीचा
परतावा हा वेळेमध्ये मिळाला पाहिजे आज महाराष्ट्र मध्ये राज्य चालवताना आम्ही
कोट्यावधी रुपयांचे कर्ज काढतो,
पण दुसरीकडे आमच्या हक्काचं जीएसटीचा परतावा केंद्र सरकारकडे अडकलेला आहे, तो 30 ते 40 हजार कोटी रुपयांच्या घरामध्ये आहे, वास्तविक पाहतात ते पैसे देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. विशेष म्हणजे
त्यांनी ते पैसे वेळेमध्ये देणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने ते पैसे तात्काळ दिले
पाहिजे असेही थोरात म्हणाले.
0 टिप्पण्या