Ticker

6/Breaking/ticker-posts

नगर जिल्हा भगवामय होत आहे -मंत्री शंकरराव गडाख

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नगर: शिवसंपर्क अभियानांतर्गत गाव तिथे शाखा उपक्रम राबविला जात असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीमुळे अनेक युवक शिवसेनेकडे आकर्षित होत आहेत, त्यांचे स्वागतच आहे,त्यामुळे नगर जिल्हा भगवामय होत आहे, असे प्रतिपादन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यानी केले.

 तालुक्यातील चिचोंडी पाटील पंचायत समिती गणातील निंबोडी, सारोळाबद्दी, कोल्हेवाडी, टाकळी काझी,मदडगाव,दशमी गव्हाण,सांडवे या गावांत जलसंधारण मंत्री  शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत झालेल्या  शिवसेना शाखा नूतनीकरनांच्या उपक्रमास शिवसैनिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.  शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मंत्री गडाख यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले व पंचायत समिती सभापती कांताबाई कोकाटे, युवा नेते प्रविण कोकाटे यांनी चिचोंडी पाटील गणामध्ये केलेल्या विकासकामांचे तसेच प्रभावीपणे राबविलेल्या शासकीय योजनांचे कौतुक केले. 

 यावेळी उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, युवा नेते संदीप गुंड,उपसभापती डॉ. दिलीप पवार, युवा नेते प्रविण कोकाटे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र भगत,युवा सेना प्रमुख प्रविण गोरे, उपतालुकाप्रमुख जिवाजी लगड, प्रकाश कुलट,गणेश कुलट,शंकर ढगे, डॉ.मारुती ससे,अविनाश पवार, शहाजी आटोळे,संदीप खामकर, बाबुराव बेरड,शंकर बेरड,अशोक आवारे,प्रकाश बोरुडे,सचिन लांडगे, आकाश आठरे,विलास शेडाळे,संतोष काळे,राजेंद्र काळे,जयसिंग काळे, नामदेव काळे,अजय बोरुडे,अमोल निक्रड,बाळासाहेब खांदवे,बाप्पू खांदवे,रमेश गव्हाणे,सुरज कराळे, संतोष कुटे,चंद्रकांत सदाफुले,भाऊसाहेब वाडेकर,विश्वसागर कोकाटे,राजेंद्र कोकाटे,प्रशांत कांबळे,सुधीर कोकाटे, देविदास शिंदे रवींद्र मस्के,वैभव पवार आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या