लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
काबूल: अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी
तालिबानची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सरकार स्थापन सोहळ्यासाठी तालिबानने सहा
देशांना आमंत्रण पाठवले आहे. यामध्ये तुर्की, चीन, रशिया, पाकिस्तान,
इराण, कतारचा समावेश आहे. अफगाणिस्तानमध्ये
जवळपास ४० वर्षानंतर पूर्ण देशावर वर्चस्व असलेले सरकार स्थापन होत असल्याने हा
क्षण ऐतिहासिक असल्याचे तालिबानने म्हटले आहे. मात्र, आता
आमंत्रण पाठवलेल्या देशांकडून तालिबानला धक्का बसण्याची शक्यता आहे.
तालिबानने
पाठवलेल्या आमंत्रणावर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने मौन धारण केले आहे.
तालिबानच्या आमंत्रणाबाबत माहिती नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग
वेनबिंग यांनी म्हटले. चीन आणि रशियाने काबूलमध्ये आपले दूतावास सुरू ठेवले आहेत.
वृत्तसंस्थांनी
दिलेल्या वृत्तानुसार, चीन तालिबान सरकार स्थापनेची प्रतिक्षा करत
आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिंग यांनी म्हटले की, चीन अफगाणिस्तानच्या अंतर्गत मुद्यांवर हस्तक्षेप करणार नाही. चीनला
अफगाणिस्तानसोबत मैत्रीपूर्ण सहकार्याचे संबंध हवे आहेत. चीन सरकार
अफगाणिस्तानमध्ये शांततेच्या दिशेने एक रचनात्मक भूमिका बजावू इच्छित आहे. चीनच्या
या भू्मिकेमागे तालिबान आणि उइगर दहशतवाद्याचे संबंध याची चिंता असल्याचे म्हटले
जात आहे.
रशियानेदेखील
आमंत्रणानंतर तालिबानसमोर अटी ठेवल्या आहेत. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई
लवरोव यांनी सोमवारी म्हटले की, तालिबान सर्व घटकांसह सरकार स्थापन करत असल्यास रशिया या सरकार स्थापन
सोहळ्यात सहभागी होणार असल्याचे त्यांनी म्हटले. अफगाणिस्तानच्या सरकारमध्ये विविध
घटकांचा समावेश हवा. या सरकारमध्ये संपूर्ण अफगाणिस्तानचे प्रतिबिंब उमटले पाहिजे
असेही त्यांनी म्हटले. तालिबान सरकारमध्ये हजारा, उज्बेक आणि
ताजिक वंशाच्या नागरिकांचा समावेश असावा असेही त्यांनी म्हटले.
0 टिप्पण्या