Ticker

6/Breaking/ticker-posts

विखे फाउंडेशन व सारडा कॉलेज संयुक्त मोठा प्रोजेक्ट उभारू : आ.राधाकृष्ण विखे पा.

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नगर : करोनामुळे बदलेल्या परिस्थिती मुळे शिक्षण संस्थानी आता डिजिटल टेक्नॉलॉजी स्वीकारणे अत्यावश्यक आहे. पारंपारिक शिक्षणाच्या पलीकडे जात शिक्षकानी काळानुरुप बदल करत कौशल्य शिक्षणावर भर देणे गरजेचे आहे. संस्थेचे सचिव संजय जोशी यांच्या नेत्रुत्वाखाली संस्थेचे भविष्य उज्वल आहे. विखे फाउंडेशन व सारडा कॉलेज एकत्र येत काही मोठा प्रोजेक्ट करण्याचा निश्चित प्रयत्न करू, असे आश्वासन माजी विरोधीपक्ष नेते आ.राधाकृष्ण विखे यांनी केले.

हिंद सेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या नव्याने उभारलेल्या इमारतीचे उद्घाटन विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते व भाजपचे जेष्ठ नेते हेरंब आवटी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात झाले. यावेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम व भाजपचे शहराध्यक्ष महेंद्र गंधे, संस्थेचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अजित बोरा,  विद्यालयाचे चेअरमन अॅड.अनंत फडणीस, जेष्ठ मार्गदर्शक ब्रिजलाल सारडा, प्राचार्य डॉ.राजेंद्र शिंदे आदींसह संचालक व विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

आ.विखे पुढे म्हणाले, हिंद सेवा मंडळात अनेक मोठ्या दिग्गजांचे योगदान लाभले असल्याने मोठी ऐतिहासिक परंपरा संस्थेची आहे. संपूर्ण राज्यात पेमराज सारडा महाविद्यालयाने नावलौकिक वाढवले आहे. सारडा कुटुंबाचे भरीव योगदान या संस्थेच्या उभारणीत आहे. संस्थेचा विस्तार होत आहे ही कौतुकाची बाब आहे. कोविड मुळे खूप बदल झाली आहेत. सर्वकाही आता ऑनलाईन सुरु झाले आहे. करोनाचा सर्वात जास्त परिणाम शिक्षण क्षेत्रावर झाला आहे. विद्यार्थी व शिक्षक खूप गोंधळलेले आहेत. राज्य सरकारच सर्वात जास्त गोंधळलेले असल्याने चुकीचे निर्णय घेतले जात आहे. शिक्षणाचा खेळखंडोबा सरकारने केला आहे. याचा परिणाम विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर झाला आहे, अशी टीका आ. राधाकृष्ण विखे यांनी केली.

हेरंब आवटी म्हणाले, पद्मश्री विठ्ठलराव विखे यांचा जन्म नगर जिल्ह्यात होणे हे भाग्याचे आहे. बाळासाहेब विखे यांची नदी जोड योजना त्यावेळी राबवली असती तर राज्यात दुष्काळ पडला नाही. विखे कुटुंबातील राधाकृष्ण यांचेही कार्य जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाचे आहे. भविष्यात ते नक्की महाराष्ट्र चालवतील हे असा मला अंदाज आहे.

चंद्रशेखर कदम म्हणाले, पेमराज सारडा महावियालाने विद्यार्थ्यांसाठी उभारलेली सुसज्ज इमारत संस्थेचे वैभव वाढवत आहे. सर्व पदाधिकारी देत असलेले योगदान कौतुकास्पद आहे.यावेळी भैय्या गंधे म्हणाले, शिक्षण संस्थांचे पेव फुटलेल्या काळात हिंद सेवा मंडळ ही जुनी व नावाजलेली संस्था आहे. चांगले काम करणाऱ्या या संस्थेस केंद्र सरकारच्या माध्यामातून सर्वतोपरी सहकार्य करू.

यावेळी अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक, सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अजित बोरा, अॅड.अनंत फडणीस, ब्रिजलाल सारडा यांची भाषणे झाली. महाविद्यालयाचे चेअरमन अॅड.अनंत फडणीस यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ.राजेंद्र शिंदे यांनी स्वागत केले. उपप्राचार्या डॉ.मंगला भोसले यांनी आभार मानले. यावेळी डॉ.पारस कोठारी, अॅड.सुधीर झरकर, सुमतिलाल कोठारी, प्रा.मकरंद खेर, प्रा.सुजित बेडेकर, अशोक उपाध्ये, अनिल देशपांडे, मधुसूदन सारडा, जगदीश झालाणी, सुरेश चव्हाण, बी.यू.कुलकर्णी, डॉ.मिलिंद देशपांडे, प्रबंधक अशोक असेरी, पर्यावेक्षक सुजित कुमावत आदी उपस्थित होते. प्रा.प्रसाद व प्रा.भावना वैकर यांनी सूत्रसंचलन केले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या