Ticker

6/Breaking/ticker-posts

दुर्दैवी : विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यू

 




लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर :  विजेचा शॉक लागून पाथर्डी तालुक्यातील विविध दोन घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला तर सोनई येथे एका महिलेचा हिट्च्या शॉकने मृत्यूमुखी पड्ली.मृत्यूत पती-पत्नीचा समावेश आहे.

 पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी भागातील शिंदेवाडी येथील बबन मोहन शिंदे वय ५५ यांच्या अंगावर चालू विजेची वायर तुटून पडल्याने राहत्या घरा समोर त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.शिंदे हे दि २१ मंगळवार रोजी दुपारी शेतीचे काम करतांना पाऊस वारा जोरात सुरू होता.त्यावेळी विजेच्या खांबावरून वीज प्रवाह घरात घेऊन जाणारी केबल अंगावर पडून शिंदे यांचा मृत्यू झाला आहे. शिंदे यांचा मृतदेह दुपारी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदनासाठी आन्यात आला होता.मयत बबन शिंदे यांची अकस्मात मृत्यूची नोंद पाथर्डी पोलिस ठाण्यात करण्यात आली.

 पाथर्डी तालुक्यातील एका गावात शेतकरी पती पत्नीला आज सकाळी विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.हे पती पत्नी सकाळी घरा समोर काम करतांना विजेचा धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्या या निधनाने गावात शोक काळ पसरली आहे.६५ वर्षीय पती आणि ५८ वर्षीय पत्नी दररोजच्या कामानिमित्त घरा समोर काम सुरू होते.त्यावेळी त्यांना प्रवाह सुरू असलेला विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने सोबतच पती पत्नीचा मृत्यू झाला.

 सोनईत  हिटरला चिटकून विवाहित महिला ठार

 गणेशवाडी रस्त्यावरील  दरंदले वस्ती येथील राहत्या घरात लाईटच्या हिटरमधून पाणी घेताना   विवाहित महिला ठार झाली आहे. सोनई पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल झाला असला तरी माहेरच्या लोकांनी सासरच्या दारातच अंत्यविधी करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

 या घटनेबाबत  सोनई पोलिस ठाण्यातून समजलेली माहिती अशी की, रविवार (ता.१९) रोजी राहत्या घरात लाईटच्या हिटरमधून पाणी घेताना पुजा प्रविण दरंदले (वय-२७)हीस करंट बसला. तिला पुढील उपचारासाठी सिव्हिल हाॅस्पिटल मध्ये नेले असता उपचारापुर्वी तिचा मृत्यू झाला आहे. सिव्हिल हाॅस्पिटलच्या खबर नुसार पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ५१/२०२१ सीआरपीसी १७४ नुसार अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या