लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
दरम्यान नुकताच त्यांच्या ऑडिओ बॉम व्हायरल झाला त्यानंतर ही त्यांनी वाळू माफियांवर धडक कारवाया केल्या ऑडिओ क्लिप समाज माध्यमांद्वारे व्हायरल झाली त्यामध्ये त्यांनी थेट यंत्रणा तसेच लोकप्रतिनिधी त्यांच्यावर निशाणा साधत आत्महत्या करण्याचा इशारा दिला त्यामुळे हे प्रकरण राज्यभर चर्चिले गेले त्यामध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराची चौकशी लावण्यात आली व कामात अनियमितता असे कारण देत त्यांची तडकाफडकी जळगाव येथे बदली करण्यात आली त्यानंतर तालुक्यात तहसीलदार पद रिक्त राहिल्याने तात्पुरता कार्यभार हा नायब तहसीलदार यांच्याकडे देण्यात आला आहे त्यामुळे तालुक्यात वाळू माफियांनी पुन्हा एकदा हैदोस घातला आहे त्याला आळा बसण्यासाठी पूर्णवेळ तालुक्यात तहसीलदार गरजेचे असून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांमार्फत या माफिया राजला आळा घालण्याचा प्रयत्न वरिष्ठ स्तरावरून होणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
प्रभारी तहसीलदार गणेश आढारी यांच्यासाठी पारनेर तालुका नवखा आहे ते नुकतेच बदलून पारनेर येथे आले आहेत त्यांच्यावर प्रभारी तहसीलदार म्हणून मोठी जबाबदारी आलेली आहे. त्यामुळे तस्करांना रान मोकळे झाले आहे. डरनेका नही मॅडम नही आयेगी असे एकमेकांना खुणावत वाळूमाफिया सुसाट सुटले असून मांडवा नदी पात्र व लगतच्या शेतातून मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन व वाहतूक सुरू झाले आहे.
0 टिप्पण्या