लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
उल्हासनगर (ठाणे): मुंबई, पुणे, अमरावती येथील
बलात्काराच्या प्रकरणांनी महाराष्ट्र सुन्न झालेला असतानाच काही तासांतच आता ठाणे
जिल्हा देखील बलात्काराच्या घटनेने हादरून गेला आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर
शहरातील रेल्वे स्थानक परिसरात हा संतापजनक प्रकार घडला. उल्हासनगर रेल्वे स्टेशन
परिसरात एका नराधमाने एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका पडक्या घरात बलात्कार
केला. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी आरोपी दादा उर्फ श्रीकांत गायकवाड याला
अटक केली आहे.
धक्कादायक म्हणजे ही मुलगी पहाटेपर्यंत त्या पडक्या घरातच होती.
त्यानंतर तिने आपल्या मित्रांना फोन केला आणि आपल्यावर बलात्कार झाल्याची माहिती
दिली.
संबंधित घटनेची माहिती मिळताच कल्याण जीआरपीचे
वरिष्ठ पोलीस निरिक्षक वाल्मीक शार्दुल यांनी या घटनेचा तपास सुरु झाला. पोलिसांनी
या प्रकरणी पॉस्कोखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी दादा उर्फ
श्रीकांत गायकवाड याला अटक केली. गायकवाडने आपला गुन्हा कबूल केला आहे.
0 टिप्पण्या