Ticker

6/Breaking/ticker-posts

श्री क्षेत्र भगवानगड परिसरात स्वराजध्वज रथ यात्रेचे भव्य स्वागत




लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 श्री क्षेत्र भगवानगड :छतपती शिवाजी महाराजाच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या विशाल भगव्या  ध्वजाची खरवंडी कासार भगवान गड परिसरामध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले .

अहमदनगर जिल्हयातिल खर्डा येथिल एैतिहासिक किल्यावर आमदार रोहीत पवार यांच्या सकंल्पनेतुन देशातीलसर्वात उंच व सर्वात मोठा असा भगव्या ध्वज  सहा राज्य व महाराष्ट्रातिल ३६ जिल्हातील एैतीहासिक व धार्मीक स्थळाना भेट देऊन त्याचे दसऱ्याच्या दिवशी खर्डा किल्यावर ध्वजारोहन होणार आहे त्यामुळे या   स्वराज्य ध्वज यात्रेचे आगमन श्रीक्षेत्र  भगवान गडाच्या पावन भुमित हि यात्रा आली.

            यावेळी स्वराज्य रथ याचे खरवंडी कासार मधील ग्रामस्थ, शिवराजे प्रतिष्ठान चे सवऺ सदस्य व भगवान गड प्रेस क्लब च्या वतीने   स्वागत करण्यात आले . खडाऺ या ऐतिहासिक किल्यावर १५ ऑक्टोबर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर स्वराज्य ध्वज उभारला जाणार आहे. आमदार रोहित दादा ची हि संकल्पना या महाराष्ट्रामध्ये एक प्रकाराने खऱ्या अथाऺने ग्रीनीज बुकात येत्या काही दिवसात नोंद होईल अशी स्वराज्य रथ यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर संपूण देशामध्ये प्रवास करत आहे महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यामध्ये व देशातल्या ६ राज्यामध्ये हा स्वराज्य रथ जाणार आहे .

सुमारे १२,००० कि. मी. चा हा खडतर प्रवास आमदार  रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली नाना गवळी व त्यांचे सर्व सहकारी करत आहेत           १२,०००कि.मी.चा प्रवासाला ९ सप्टेंबर पासुन सुरू झाला आहे आतापर्यंत १६ जिल्हे पार झाले पण वाटत नाही कि १६ तास झाले असे गवळी म्हणाले हा स्वराज ध्वज महाराष्ट्रात नव्हे तर देशात उंच फडकणार आहे या स्वराज्य ध्वजाची वैशिष्ट्य म्हणजे ध्वजाचे वजन ९० किलो आहे ध्वजासाठी जो स्तंभ उभारला जाणार तो १८ मेट्रिक टन इतकी आहे याची उंची ७४ मीटर आहे याच्या पाठीमागचा इतिहास नवीन पिढीला कळावा म्हणून हा ध्वज त्या पद्धतीने उभारला जाणार आहे 

६ जुन १६७४ रोजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्याचे स्मरण डोळ्यासमोर ठेवून ७४ मीटर उंची ठेवली आहे स्वराज्य निर्माण करण्यासाठी १८ पगड जातीचे लोक एक मावळे घटट करून स्वराज्य जिंकले त्याचे स्मरण ठेवून १७ मेट्रिक टनाचा स्तंभ उभारण्यात आला आहे कुठल्याही जाती किंवा पक्षाचा हा ध्वज नाही सर्व सामान्य लोकांचा आहे नवीन युवकाचे आचार विचार सुधारले पाहिजे हे त्यांच्या पाठिमागचे उदिष्ट आहे असे गवळी यांनी सांगितले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे, पंचायत समिती सदस्य किरण खेडकर,जलक्रांतीचे प्रणेते दत्ता बडे, नगरसेवक चांदजी मनियार    राजेंद्र जगताप , प्रेस क्लब अध्यक्ष कृष्णनाथ अंदुरे पत्रकार दादासाहेब खेडकर, अशोक आव्हाड, बाबु जायभाये, सतिश जगताप,अमोल होरणे, सतिश जाधव ग्रा. सदस्य योगेश अंदुरे,  ,रावसाहेब पवळे, शिवराजे प्रातिष्ठाणचे सर्व सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या