Ticker

6/Breaking/ticker-posts

शेतीच्या वादातून दोन मुलांनी केला बापाचा खून ..

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नेवासा : माझ्या पतीचा शेतीच्या वादातून दोन्ही मुलांनी खून केल्याची तक्रारच सावत्र आईने केल्याने दोघा मुलांना नेवासा पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. नेवासा तालुक्यातील कारेगाव याठिकाणी ही घटना शुक्रवारी (दि.१७)घडली आहे 

 माझे पती लक्ष्मण दादा लोणारे वय ७१  वर्ष रा. कारेगाव ता. नेवासा हे आमचे शेतात शौचासाठी  गेलेअसता  माझ्या सवतीचे मुले भाऊसाहेब लक्ष्णम लोणारे व अशोक लक्ष्मण लोणारे दोन्ही रा. रांजणगाव ता. नेवासा जि. अहमदनगर यांनी जुन्या शेतीच्या वादातुन धारदार हत्याराने माझ्या पतीच्या डोक्यात व हातावर वार करुन गंभीर दुखापत करुन जिवे ठार मारले असल्याचे मयताच्या दुस-या पत्नीने फिर्यादीत म्हटले आहे. 

 मयताची दुसरी पत्नी सुनिता लेणारे  हिने नेवासा पोलीसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले की१७ रोजी सकाळी ७ वा. सुमारस माझे पती लक्ष्मण दादा लोणारे हे झोपीतुन उठुन नेहमीप्रमाणे शौचासाठी  शेतात गेले होते. व ब-याच वेळ होवुन सुद्धा परत घरी आले नाहीत. म्हणुन मी त्यांना शोधण्यासाठी शेताकडे गेल्यावर मला माझ्या सवतीचे मुले  भाऊसाहेब लक्ष्णम लोणारे व  अशोक लक्ष्मण लोणारे दोन्ही रा. रांजणगाव ता. नेवासा हे मक्‍याचे शेतातुन ऊसाकडे पळताना दिसुन आले. मी त्या दिशेने मकाचे शेतात जावुन पाहोले असता मला माझे पती  जखमी अवस्थेत शेतात पडलेले दिसुन आले. मी त्यांना पाहुन आरडा ओरडा केला असता, माझी नणंद परेगाबाई ही शेताकडे पळत आली व तिच्या पाठीमागे माझे दिर बाबासाहेब हेदेखील तिच्या पाठीमागे आले. मी माझ्या पतीचेजवळ जावुन पाहीले असता त्यांचे हातावर धारदार शस्त्राच्या जखमा दिसल्या व डोक्यात कपाळावर धारदार शस्त्राचे वार झाल्याने कपाळ फाटलेले दिसले.

 आजुबाजुस मकाच्या पाणावर रक्‍त लागलेले दिसले व डोक्याचे खाली रक्‍त जमीनीवर जमा झालेले दिसले. मी त्यांना हात लावून हालवुन पाहीले असता. त्यांनी काहीएक प्रतिसाद दिला नाही. दिलेल्या तक्रारीवरून नेवासा पोलीसांनी दोघा मुलांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार करित आहेत. 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या