Ticker

6/Breaking/ticker-posts

जयंती निमित्त लोकनेते घुले पाटील यांना अभिवादन

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 भेंडा : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांना  ९१ व्या जयंतीनिमित्त कारखाना व उद्योग समूहाचे अध्यक्ष माजी आ. नरेंद्र घुले ,संचालक माजी आ.चंद्रशेखर घुले ,उपाध्यक्ष माजी आ.पांडुरंग अभंग,जेष्ठ संचालक अड.देसाई देशमुख,काकासाहेब नरवडे, डॉ.क्षितिज घुले हभप शिवाजी महाराज देशमुख,श्रीसंत नागेबाबा देवस्थानाचे अंकुश महाराज कादे,दिलीपराव लांडे, उदयन गडाख , कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,सचिव रवींद्र मोटे आदींनी  स्व.घुले पाटील यांचे स्मृतिस्थळावर पुष्प अर्पण करून अभिवादन केले. 

 नेवासा येथील संत तुकाराम महाराज संस्थांनचे प्रमुख उद्धव महाराज मंडलिक म्हणाले,संत ज्ञानेश्वर माऊली हे अध्यात्मिक क्षेत्रातील सर्वोच्च संत होऊन गेले.हे विश्वची माझे घर अशी व्यापकता त्यांनी हृदयात बाळगली,तो विचार समाजाला दिला,सर्व जाती धर्म-पंथ माऊलींनी आपलं म्हंटल म्हणून सर्व जगाने ने ही त्यांना आपले मानले. राजकारणात काम करताना माऊलींचा तोच विचार लोकनेते घुले पाटलांनी तंतोतंत वापरला.गोर-गरीब,सर्व जाती धर्मांतील लोकांची कामे केली.विचारांचा मोठापणा असलेले व्यक्तिमत्त्व लाभलेला परिसर समृद्ध होत असतो.

 यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, काशिनाथ नवले, दादासाहेब गंडाळ, मुळा कारखान्याचे संचालक भाऊसाहेब मोटे डॉ.शिवाजी शिंदेरावसाहेब कांगुणे, प्रभाकर कोलते, भयासाहेब देशमुख, दत्तात्रय खाटीक,शिवेसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ शेळके,रामदास गोल्हार,महंमद आत्तार,शब्बीरभाई शेख,रामभाऊ जगताप,ड.बाळासाहेब शिंदे,बाळासाहेब नवले,उत्तमराव वाबळे,बापूसाहेब नजन,ज्ञानेश्वरचे संचालक काकासाहेब शिंदे,बबनराव भुसारी,मच्छिंद्र म्हस्के, शिवाजी कोलते,अशोकराव मिसाळ,कामगार संचालक सुखदेव फुलारी,संभाजी माळवदे,जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे,तुकाराम मिसाळ, बबनराव धस ,अंबादास कळमकर,गोरक्षनाथ कापसे,रामभाऊ पाउलबुद्धे,भानुदास कावरे  आदिंनी स्व. घुले पाटिल यांना अभिवादन केले. 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या