Ticker

6/Breaking/ticker-posts

अत्याधुनिक व सर्जनशील सेवेमुळे दीनदयाळ पतसंस्था प्रगतीपथावर - वसंत लोढा

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नगर : पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या ग्राहकठेवीदारकर्जदार व सभासदांना अत्याधुनिक  तत्पर सेवा मिळावी यासाठी पतसंस्थेच्या कारभारात आधुनिक तंत्रज्ञान युक्त करत डीजीटल मोबाईल बँकिंग सेवा देत आहे. करोनाच्या आपत्कालीन परिस्थीतित ग्राहकांना दिलासा देत कमी केलेल्या व्याजदराचा कर्जदार लाभ घेत आहे. केवळ नफा कमवणे हा उद्देश नसून पतसंस्था सामाजिक उपक्रमांना भरपूर प्राधान्य देत आहे. अत्याधुनिक विनम्र व सर्जनशील सेवे मुळे पतसंस्थेचे कामकाज वेगाने प्रगतीपथावर जात असल्याने नव्या ठेवी व कर्ज वसुली व्यवस्थित होत आहे. यात कार्माचारींचे भरीव योगदान आहे. डीजीटल व मोबाईल बँकिंग सेवा मिळत असल्याने ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेत घरूनच व्यवहार करावेत, असे प्रतिपादन पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांनी केले.

 

पंडित दीनदयाळ पतसंस्थेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन चेअरमन वसंत लोढा यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने उत्साहात संपन्न झाली. यावेळी मानद सचिव विकास पाथरकरउपाध्यक्ष गौतम दीक्षित, जेष्ठ संचालक सुधीर पगारीयाशैला चंगेडेडॉ. ललिता देशपांडेनकुल चंदेकिरण बनकरनरेंद्र श्रोत्री, अनिल मोहिते आदी पदाधिकारी संस्थेच्या मुख्य कार्यालयात उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्यने सभासद ऑनलाईन सहभागी झाले होते. विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर झाली. सभासदांनी केलेल्या सूचना व प्रश्नांना पदाधीकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. पतसंस्थेच्या ठेवींमध्ये भरीव वाढ झाली असून नफ्यातही वाढ होत साडे पंचवीस लाख रुपयांचा नफा झाला आहे. सभासदांना १० टक्के लाभांष जाहीर करण्यात आला.

 

मानद सचिव विकास पाथरकर म्हणालेस्पर्धेच्या व करोना संकट काळातही दीनदयाळ पतसंस्थेचा उत्कृष्ट व विना तक्रार कारभार होत आहे. करोनाच्या संकटा मुळे जरी कर्ज वसुलीवर परिणाम झाला असला तरी संयमाने पण रीतसर कर्ज वसुली करत एनपीए कमी करण्यात यश आले आहे. सुधीर पगारिया म्हणालेपंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदय विचारांवर आम्ही काम करत आहोत. सर्वसामान्य नागरिक व महिलांना आधार देत आर्थिक सक्षम करत आहोत.

सभेचे सूत्रसंचालन किरण बनकर यांनी केले, व्यवस्थापक निलेश लाटे यांनी अहवाल वाचन केलेउपव्यवस्थापक सुखदेव दरेकर यांनी आभार मानलेयावेळी सुनील रामदासी, प्रा.मधुसूदन मुळे, सचिन पारखी आदींनी चर्चेत भाग घेत सूचना केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या