Ticker

6/Breaking/ticker-posts

परळी सुन्न आहे, राज्याची मान खाली गेलीय; पंकजा मुंडेंच्या ट्वीटची चर्चा

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

बीड: माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या नव्या ट्वीटमुळं चर्चेला उधाण आलं आहे. 'परळी सुन्न आहे. राज्याची मान खाली गेली आहे,' असं ट्वीट पंकजा यांनी केलं आहे. करुणा शर्मा यांच्यावरील पोलीस कारवाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या या ट्वीटचा रोख सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडंच असल्याचं बोललं जात आहे.

धनंजय मुंडे यांच्याविरोधात करुणा शर्मा यांनी उघडलेल्या आघाडीमुळं सध्या बीडचं राजकीय वातावरण तापलं आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात आपल्याकडं पुरावे असून ते पत्रकार परिषदेत देणार असल्याचं करुणा शर्मा यांनी काल जाहीर केलं होतं. हे पुरावे जाहीर करण्यासाठी करुणा शर्मा परळीत आल्या असता काही महिलांनी त्यांना घेराव घातला व धनंजय मुंडे यांच्या बदनामीबाबत जाब विचारला. त्यावेळी शाब्दिक चकमक झाली. करुणा शर्मा यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप दोन महिलांनी केला. त्यावरून पोलिसांनी करुणा शर्मा यांना ताब्यात घेतले. त्याचवेळी त्यांच्या गाडीत पिस्तूल मिळाले. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला व त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.


या सगळ्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी ट्वीट केलं आहे. चुकीचे लोक शक्तिशाली असल्यामुळंच अन्याय होतो असं नाही. पराक्रमी हात बांधून बसतात म्हणूनही अन्याय होतो. शासनप्रशासनन्यायव्यवस्था कोणीही आपल्या दारात नाही बांधू शकत हा विश्वास हरवू नये. चुकीचा पायंडा पडू नयेही काळाची गरज आहे,' असं पंकजा यांनी म्हटलं आहे. परळी सुन्न आहेराज्याची मान खाली गेली आहे,' असं पंकजा यांनी पुढं म्हटलं आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या