घोडेगाव- सोनई रस्त्याचे नामदार देसाई यांच्या हस्ते भूमिपूजन
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
घोडेगाव ते सोनई या 8 किमी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आज शुक्रवारी (दि 3 सप्टेंबर ) रोजी साय 5 वां. शनीचौक घोडेगाव ता नेवासा येथे उद्योगमंत्री ना सुभाषजी देसाई यांच्या शुभहस्ते व ना शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता . कोरोना नियमाचे पालन करत कमी लोकात हा कार्यक्रम पार पडला.
घोडेगाव येथील रस्त्याचे भूमिपूजन झाल्यावर सोनई येथील मुळा शैक्षणिक संस्थेच्या आमराई विश्रामगृहात नगर जिल्ह्यातील सेनेच्या पदाधिकाऱ्यांची शिव सवांद बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते .
पुढे बोलतांना ना. देसाई म्हणाले की ,आपल्या नगर जिल्ह्याचे सुपुत्र असणारे ना शंकरराव गडाख यांचा विकासकामांचा पाठपुरावा अभिनंदनिय असतो.मंत्री नेवासा तालुक्यासह जिल्हयातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आहेत. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या खास विश्वासातले मंत्री ना गडाख आहेत .त्यामुळे नेवासा तालुक्यासह नगर जिल्ह्याच्या विकास कामांना निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही ना.देसाई यांनी दिली. विकास कामे होत असताना ती गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी गडाख स्वतः लक्ष ठेवून काम करतात त्यामुळे विकासकामे टिकणारी व लोकउपयोगी स्वरूपाची अशी होणार आहेत. येथून पुढेही संपूर्ण राज्य मंत्रीमंडळाच्या माध्यमातून आम्ही नेवासा तालुक्याला भरघोस निधी देणार आहोत तसेच ना गडाख यांनी कोरोनाच्या काळात देखील मोठ्या प्रमाणावर निधी मिळवून कामे सुरू ठेवली आहेत यातून नेवासा तालुक्याचा कायापालट होणार आहे.
ना शंकरराव गडाख यांनी पांढरीचा पुल नेवासा एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग व्यवसाय यावेत यासाठी जी मागणी केली आहे ती लवकरच मार्गी लावून पांढरीचा पुल नेवासा एम आयडीसीच्या विकासासाठी योग्य ते सहकार्य करू व सर्वोत्तपरी मदत करू असे ना देसाई म्हणाले. यावेळी बोलताना ना शंकरराव गडाख यांनी ना सुभाष देसाई यांचे स्वागत केले तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना लोकउपयोगी कामे करता येतात याबद्दल गौरवउद्गार काढले.
नेवासा तालुक्याच्या विकासकामांत ना सुभाष देसाई यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभते असेही गडाख म्हणाले.व पुढील काळात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पांढरीचा पुल नेवासा एम आय डी सी चा कायापालट करून नवीन उद्योग व्यवसाय आणून तालुक्याच्या विकासात हातभार लावू आपणही सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन ना गडाख यांनी उपस्थितांना केले.
यावेळी शिवसेनेचे नगरजिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, उत्तरजिल्हा शिवसेना अध्यक्ष रावसाहेब खेवरे,अर्थ पशुसंवर्धन सभापती सुनीलराव गडाख,सभापती रावसाहेब कांगुणे,उपसभापती किशोर जोजार,मुळाचे चेअरमन नानासाहेब तुवर,व्हा चेअरमन कडुबाळ कर्डीले,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती डॉ शिवाजीराव शिंदे,बाळासाहेब सोनवणे,दिलीपराव लोखंडे, मच्छिद्र म्हस्के,हरिभाऊ शेळके,मच्छिद्र धुमाळ,संदेश कार्ले,संभाजी कदम,दिलीप सातपुते,योगीराज गाडे,राजेंद्र गवळी,बाबूशेठ टायरवाले, नानासाहेब रेपाळे, सुहास गोंटे, वसंतराव सोनवणे,अशोकराव येळवंडे,पंकज लांभाते,महावीर नहार,डॉ सुनील वैरागर, दगडू इखे,अरुण जाधव,भास्कर जाधव,दत्तात्रय ब-हाटे आदीसह नेवासा तालुक्यासह नगर जिल्ह्यातील पदाधिकारी ,शिवसैनिक उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक भाऊ कोरगावकर यांनी केले तर आभार उत्तर जिल्हा शिवसेना प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी मानले.
0 टिप्पण्या