मनोहर भोसलेचे कर्जत कनेक्शन; चिलवडीत ९ एकराची जमीन खरेदी
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
कर्जत/करमाळा: कर्करोग बरा करतो असे
सांगुन बाभळीचा पाला, साखर,भंडारा देत
२ लाख ५१ हजारांची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी मनोहर भोसले उर्फ मनोहरमामा व
त्याच्या अन्य दोन साथीदारांवर विविध कलमांद्वारे बारामती तालुका पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करमाळा पोलीस ठाण्यातही महिलेच्या लैंगिक शोषणाचा
गुन्हा दाखल झाल्याने राज्यभर एकच खळबळ उडाली आहे.
लोकांचे भविष्य सांगताना संत
बाळुमांच्या नावाने मनोहर मामाने करोडो रुपयांची स्थावर मालमत्ता जमवली आहे. आता
कर्जत तालुक्यातील चिलवडी येथेही मनोहरमामाने स्वतःच्या नावावर ९ एकर २ गुंठ्यांची
जमीन खरेदी केली असल्याचे उघड झाले आहे. खरेदी केलेल्या ३ हेक्टर ६२ आर क्षेत्राची
सरकारी खरेदी किंमत २१ लक्ष ८५ हजार रुपये एवढी आहे.ही खरेदी ३० एप्रिल २०१९ रोजी
करण्यात आलेली आहे.खरेदीची ही सरकारी किंमत जरी कमी असली तरी प्रत्यक्षात ही रक्कम
किती असेल याचे कुणाला आश्चर्य वाटायला नको.
राज्यात
गाजत असलेल्या मनोहर भोसले याने लोकांचे भविष्य सांगण्याच्या नावाखाली लाखो
लोकांचा खासगी डेटा गोळा केला असुन एका सरकारी पोर्टलचा गैरवापर करून लोकांची
माहिती मिळवत तीच माहिती स्वतःची विद्या म्हणुन लोकांना सांगत असतो असा दावा
क्रांतीकारी आवाज संघटनेचे कार्याध्यक्ष मच्छिन्द्र टिंगरे यांनी केला आहे.दरम्यान
अनेक मातब्बर राजकीय बड्या हस्तींचे मनोहर मामांसोबतचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल
झाल्याने त्याच्या चर्चेत मोठी भर पडली आहे.
मनोहर भोसले हा २०१३ सालापर्यंत झोपडीत राहत
होता.त्यानंतर त्याच्या संपत्तीत होत गेलेली वाढ सर्वांनाच विचार करायला लावणारी
आहे.स्वतःच्या नावावर कर्जत तालुक्यातील चिलवडी येथे ९ एकर जमीन, तसेच पत्नीच्या नावावर २७ एकर जमीन,
करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथे दिड एकर जमीन, एक हजार स्क्वेअर फुटचा बंगला,मठ, तर बारामती तालुक्यातील सावंतवाडी गोजुबावी येथे एक मठ, महागडे फर्निचर, महागडे मोबाईल, लाईट पाणी, संरक्षक भिंती, असा
खर्च कुठून येतो असा सवाल उपस्थित केला जात आहे. मनोहर भोसले यांनी रजिस्टर केलेली
शिवसिद्धी संचालित मामा संस्था ही बारामतीत रजिस्टर असताना देणग्या मात्र उंदरगाव
येथे गोळा केल्या जात आहेत. शिवाय या देणग्या कशासाठी गोळा केल्या जात आहेत?
याचे कारण पावतीवर नमुद केले जात नसल्याचे प्रश्न क्रांतिकारी आवाज
संघटनेने व्यक्त केले आहेत.
मालिकांसाठी आर्थिक मदत !
मनोहर भोसले उर्फ मनोहरमामा याने
बाळूमामाच्या नावानं चांगभलं, रात्रीस खेळ चाले,१०० डे या मराठी टिव्ही मालिकांसाठी आर्थिक मदत पुरवली असुन याचा निर्माता
संतोष गजानन आयचीत हा मनोहर भोसलेचा व्यावसायिक पार्टनर असल्याची माहिती समोर येत
आहे.
0 टिप्पण्या