लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
औरंगाबाद: मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांच्या 'भावी सहकारी' असा विरोधी पक्षांच्या नेत्यांचा
उल्लेख असलेल्या वक्तव्यानंतर शिवसेना-भाजप एकत्र येणार का?, किंवा भाजपचे मोठे नेते शिवसेनेत प्रवेश करणार का?, या
प्रश्नांभोवती राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. यावर
आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या वक्तव्यांबरोबर भाजप नेत्यांनी नेत्यांनी देखील मते
मांडल्याने या मुद्द्यांवरील गोंधळ आणखीनच वाढला. आता तर शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांच्या
वक्तव्याने या गोंधळात आणखीच भर पडली आहे. अब्दुल सत्तार यांनी हे वक्तव्य भाजप
नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे.यांच्यासमोरच
केल्याने या चर्चेला अधिकच हवा मिळाली आहे.
शिवसेना
नेते अब्दुल सत्तार एका वृतवाहिनीशी बोलत होते. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष
पुन्हा एकत्र यावेत यासाठी आपण मध्यस्ती करणार का, असा प्रश्न अब्दुल सत्तार यांना विचारण्यात आला. त्यावेळी सत्ता म्हणाले
की मी मध्यस्थी करण्याइतका मोठा नाही. मात्र, मध्यस्थी करण्याची
वेळ आली तर मध्यस्ती करू शकतो. मात्र यामध्ये माझे वैयक्तिक मत असे आहे की,
सर्वात अगोदर पंतप्रधान मोदी किंवा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वत: येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शब्द
द्यायला हवा. पुढील तीन वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री असतील असा शब्द
पंतप्रधान मोदी किंवा अमित शहा असा शब्द त्यांनी दिला पाहिजे. तसे झाले तर दोन
पक्ष नक्कीच एकत्र येतील असे अब्दुल सत्तार म्हणाले.
0 टिप्पण्या