(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
खरवंडी कासार : पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय व्यवस्थापन समिती चे पुनर्गठन करण्यात आले असून व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी महादेव जगताप व उपाध्यक्षपदी शब्बीरभाई बागवान यांची निवड करण्यात आली.
यावेळी खरवंडी कासार चे सरपंच प्रदीप पाटील मुख्याध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष मिथुन डोंगरे राजु जगताप, रावसाहेब पवळे, धोंडीराम केळगंद्रे मेजर, भाजपा अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष रशिद भाई तांबोळी,सुशिल जगताप, सुजित जगताप मुख्याध्यापक अशोक ढोले यापुर्वीचे शालेय समिती अध्यक्ष पंढरीनाथ केकाण उपस्थित होते , शालेय व्यवस्थापन समिती सदस्य म्हणुन योगेश अंदुरे मच्छीद पवळे शैलेंद्र जायभाये, आरिफा बागवान,शोभा बोरुडे,जाहिदा पठाण,गणेश सोनवणे,पुजा अदुंरे,रेखा जगताप, शितल पडोळकर,अशोक केळगंद्रे, शिक्षक प्रतिनिधी म्हणुन विश्वास कराड यांची निवड करण्यात आली , यावेळी सर्व मान्यवरांनी नुतन अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सन्मान केला .
नवीन समितीसमोर मोठे आव्हान
यापुर्वीच्या व्यवस्था पण समिती च्या कार्य काळात या शाळेची नवीन इमारत बांधकाम झाले आहे त्यासाठी या समिती ने मोठा संघर्ष केला येथे जिर्ण झालेली बिट्रीश कालीन इमारत धोकादायक होती त्यामुळे महादेव मंदीर ग्रामपंचायत कार्यालयात शाळा भरून प्रशासण जागे केले त्यामुळेच येथे आता शाळेला नविन इमारत झाली आहे कोरोना च्या साथि मुळे आतापर्यंत शाळा बंद होत्या त्यामुळे मुलाचे शिक्षणा वर दुर्लक्ष झाले आहे त्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी खरवंडी कासार येथिल शाळा व्यवस्थापण समिती वर आता मोठी जबाबदारी असणार आहे तसेच येथिल शाळा बंद राहील्या नतंर मुलाच्या शाळा ऐवजी हि शाळा सैराटा ची चावडी बनली होती त्याकडे शिक्षाका नी दुर्लक्ष केले होते या मध्ये बदल झाला असला तरी आता या शाळेत गुणवतेचे दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी शिक्षक पालक ग्रामस्थ यांचा समनव्य साधत शाळेच्या मुलभुत व भौतिक सुविधा देण्याची जबाबदारी नवीन समिती वर असणार आहे.
0 टिप्पण्या