लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई : राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यातील शाब्दिक युद्ध विकोपाला गेले आहे. आपल्या भाषणात शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर सडकून टीका केल्यानंतर वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'मी वाघ आहे वाघ, माझ्यावर कोल्हे कुत्रे भुंकत आहेत. पण मी कोल्ह्या-कुत्र्याना घाबरत नाही.
चित्रा वाघ यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, वाघावर कोल्हे कुत्रे भुंकताहेत.
कारण मी पीडितांच्या पाठीशी उभी राहते. सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले.
आता माझ्या परिवाराची बदनामी सुरू आहे. मी काय आहे, काय नाही
हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या. वाघ आहे मी लक्षात ठेवा. कोल्ह्या
कुत्र्यांना घाबरणारी नाही, असं वाघ यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले महेबूब शेख?
महेबूब शेख यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं की, आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत
नाही, आणि बाप बदलणारे तर आम्ही मुळीच नाही. डायलॉगबाजी सोडा
आणि आपल्या नवऱ्यावर 5 जून 2016 ला
कारवाई झाली तेव्हा सरकार कुणाचं होतं ते सांगा? त्यांनी
कोणत्या बुध्दीने कारवाई केली होती याचं उत्तर द्या. तुम्ही काय आहात हे आम्ही
पाहिलंय. कुणाला विचारायची आवश्यकता नाही, अशा शब्दात मेहबूब
शेख यांनी चित्रा वाघ यांना उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलंय की, जसं आम्ही म्हणतो की आमची नार्को टेस्ट करा, तसं
तुम्हीही म्हणा की नवऱ्याची पण नार्को टेस्ट करा कर नाही त्याला डर कशाला. भुंकतंय
कोण हे महाराष्ट्र बघतोय. आणि मी पण बाप बदलणाराच्या बापाला पण भीत नाही, असं मेहबूब शेख यांनी म्हटलं आहे.
0 टिप्पण्या