Ticker

6/Breaking/ticker-posts

पिंपळगांव माळवी तलाव परिसराचा पर्यटनाच्यां दृष्टिने विकास करणार - महापौर सौ. शेंडगे

 


 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नगर: अहमदनगर महानगरपालिकेच्‍या मालकीची 700 एकर जागा असलेल्‍या पिंपळगांव माळवी तलाव परीसराचा पर्यट्नाच्या उद्देशाने विकास करण्यात येइल असे प्रतिपादन महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यानी केले. पिंपळगांव माळवी तलाव नुकताच भऊन वाहु लागला असून येथील पाण्‍याचे जलपुजन महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

 यावेळी माजी शहर प्रमुख.संभाजी कदममाजी उपमहापौर अनिल बोरूडे, संजय शेंडगे, नगरसेवक गणेश कवडे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, संतोष गेणाप्‍पा, पिंपळगांव माळवीचे सरपंच सौ.राधिका प्रभुणे, उपसरपंच सौ.भारती बनकर, सुभाष झिने, सोसायटीचे चेअरमन शशिकांत गायकवाड, ग्रामपंचायत सदस्‍य बापू बेरड, सतिष बनकर, संजय प्रभुणे, किशोर कानडे, श्रेयश कुलकर्णी  आदी उपस्थित होते. 

महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी सांगितले की, अहमदनगर महानगरपालिकेच्‍या पिंपळगांव माळवी तलाव पावसाच्‍या पाण्‍याने भरलेला असून नगर शहरापासून अगदी जवळच हा परिसर आहे. निसर्ग संपन्‍न वातावरण यामुळे या परिसरात नागरिक सुट्टीच्‍या दिवशी फिरण्‍यासाठी येतात. नागरिकांना तलाव परिसरात बसण्‍यासाठी चांगले बाकडे बसविण्‍यात येतील.  काही ठिकाणी विद्युत व्‍यवस्‍था देखील करण्‍याचे प्रशासनाला सां‍गण्‍यात आले आहे. तलाव भरल्‍यानंतर सांडेवरून वाहणारे पाणी दगडी फरशीवर वाहून खाली जाते जास्‍त पाऊस झाल्‍यावर रस्‍त्‍याचा अंदाज येत नाही. त्‍यामुळे अपघात होतात; त्‍यासाठी रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूला रिलींग बसविण्‍यात येईल.

 यावेळी सरपंच मा.सौ.राधिका प्रभुणे यांनी सांगितले की, त्‍या ठिकाणी असलेला वॉल ला गळती असून त्‍यामुळे पाणी वाया जाते. तलाव परिसरातील आजू बाजूला असलेली  झाडे झुडपे काढणे बाबत सांगितले. याबाबत मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी जलअभियंता यांना वॉल दुरूस्‍ती करण्‍याचे आदेश दिले आहेत.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या