Ticker

6/Breaking/ticker-posts

मनपाच्या विरोधी पक्षनेतेपदी भैय्या गंधे यांची नियुक्ती करण्याची मागणी

 *प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व शिवाजीराव कर्डिले यांच्या संमतीचे पत्र महापौरांकडे 



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर:  अहमदनगर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी  भाजपाचे नगरसेवक तथा शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र (भैय्या) गंधे यांची तात्काळ नियुक्ती करावी अशा मागणीे करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व  प्रभारी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या संमतीचे पत्र नुकतेच महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांना देण्यात आले आहे.

यावेळी नगरसेवक स्वप्नील शिंदे, मनोज दुलम, रामदास आंधळे, तायगा शिंदे, संजय ढोणे, उदय कराळे, मनोज कोतकर, भाजपाचे संघटन सरचिटणीस अ‍ॅड. विवेक नाईक, सरचिटणीस तुषार पोटे, महेश नामदे, उपाध्यक्ष सचिन पारखी, रोहित दसरे, अमित गटणे आदिंसह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी नगरसेवक भैय्या गंधे म्हणाले, भाजप पक्षाचे पदाधिकारी हे पक्षाचा आदेश मानणारे कार्यकर्ते आहेत. पक्षाच्या माध्यमातून चांगले काम करणार्‍यांना विविध पदांवर संधी मिळत असते. अहमदनगर महानगरपालिकेत भाजपाचे सर्वच नगरसेवक चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. आता विरोधी पक्षनेतेपदी वरिष्ठांनी आपल्या नावाची निवड करुन आपल्यावर जो विश्वास दाखविला आहे. त्यास पात्र राहुन भाजपच्या  सर्व नगरसेवकांच्या एकत्रित विचाराने निर्णय घेऊन मनापातील सत्ताधार्‍यांवर अंकुश ठेवण्याचे काम करु, असे सांगितले.

यावेळी उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, नगरसेवक सचिन शिंदे, संतोष गेनप्पा आदि उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या