लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
खरवंडी
कासार : पाथर्डी तालुक्याच्या पुर्वभागात सततच्या
पडणाऱ्या पावसाने पिके पाण्यात
सडुण गेली आहेत आस्मानी सकंटात शेतकरी सापडला असुन या भागात शासणाने ओला दुष्काळ
जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी भाजपा
तालुकाउपध्यक्ष संजय किर्तने यांनी केली आहे .
सततच्या
पावसाने पिके पाण्यात आहेत कुजली आहेत प्रचंड नुकसान
झाले आहे मालेवाडी भारजवाडी खरवंडी कासार जवळवाडी
एकनाथवाडी मिडसांगवी भालगाव या सर्व गावांमध्ये पिकाचा नाश झाला आहे व शेतकरी
कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे हे सरकार शेतकरी हिताचे नसून
शेतकरी विरोधी सरकार आहे आशि टिका भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय किर्तने यांनी
केली त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच सरकारने सरसकट पंचनामे करून लवकरात लवकर मदत
मिळवून द्यावी.
मदत
मिळाली तर शेतकरी
आत्महत्या होणार नाहीत. शेतकऱ्याने बियाणे खतासाठी खर्च
केलेले पैसे ही आता शेतीतून परत मिळणार नाही शेतकऱ्यांचे कष्ट वायाला जात
आहे तरी प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करून शासनाला
त्वरित कळवावे तसे नाही झाले तर लवकरच पाथर्डी तालुक्यात मोठे आंदोलन उभे केले जाईल
असा इशारा भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय किर्तन यांनी दिला आहे.
0 टिप्पण्या