Ticker

6/Breaking/ticker-posts

आमदार राजळे यांनी शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील नुकसानीची केली पाहणी

 



लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

  शेवगाव : आमदार मोनिकाताई राजळे यांनी शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील मौजे हातगाव, मौजे कांबी, मौजे शिंगोरी या भागात अतिवृष्टी व पूर परिस्थिती यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.



येथे शेतकऱ्यांच्या पिकाचे व पाळीव प्राण्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच अनेक नागरिकांच्या घरात पाणी जाऊन संसार उपयोगी वस्तू आणि व्यापाऱ्यांच्या दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचा  आमदार मोनिकाताई राजळे यांनी प्रशासनाला सूचना केल्या



   यावेळी आ. राजळे यांनी नुकसंग्रतांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला तसेच  शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळणेसाठी मी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी शिंगोरी, कांबी व हातगाव येथील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या