Ticker

6/Breaking/ticker-posts

क्रिकेटमध्ये घड्ला अनोखा इतिहास; चेंडू न टाकताच घेतल्या ४ विकेट..!

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

नवी दिल्ली: क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी एक घटना घडली आहे ज्याचा विचार कोणत्याही खेळाडूने अथवा चाहत्याने केली नसले. आयसीसीच्या महिला टी-२० वर्ल्डकपच्या आफ्रिका खंडातील पात्रता फेरीच्या लढतीत असा एक विक्रम झाला आहे, जो कोणत्याही संघाला नकोसा वाटले.

युगांडा आणि कॅमरून या दोन संघात झालेल्या लढतीत एक किंवा दोन नव्हे तर चार फलंदाज मांकडिंग पद्धतीने बाद झाले. विशेष म्हणजे या सर्व विकेट एकाच गोलंदाजाने म्हणजे मेएवा डोउमाने घेतल्या. पण इतक सर्व करून देखील मेएवाला संघाला विजय मिळून देता आला नाही. या सामन्यात युगांडाने विजय मिळवला पण त्यांच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदला गेला.

मेएवालाने १६व्या तिसऱ्या चेंडूवर केव्हिन अविनोला मांकडिंग केले. तर त्याच ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर रिता मुसामलीला त्याच पद्धतीने पुन्हा एकदा बाद केले. या दोन फलंदाजांना बाद केल्यानंतर संघातील अन्य फलंदाज सावध होतील असे वाटले होते. पण मेएवाने इमेक्युलेट नकिसुवी आणि जेनेट म्बाबजीला देखील अशाच पद्धतीने बाद केले. युगांडाच्या या चारही फलंदाजांनी चेंडू टाकण्याआधी क्रीझ सोडण्याची चूक केली. या घटनेचा व्हिडियो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

युगांडाने २० षटकात ६ बाद १९० धावा केल्या. यात ३५ धावा अतिरिक्तच्या होत्या. उत्तरा दाखल कॅमरूनला १४.३ षटकात फक्त ३५ धावा करता आल्या. त्याचे ७ फलंदाज शून्यावर बाद झाले. फक्त एका फलंदाजाला दुहेरी धावसंख्या करता आली.


आयपीएल २०१९ मध्ये भारताचा फिरकीपटू आर अश्विनने अशा पद्धतीने फलंदाजाला बाद केले होते. त्यानंतर त्याच्यावर बरीच टीका झाली होती. पंजाब किंग्जकडून खेळताना त्याने राजस्थान रॉयल्सचा फलंदाज जोस बटलरला मांकडिंग केले होते.

काय असते मांकडिंग

नॉन स्ट्रायकरच्या दिशेला थांबलेला फलंदाज जेव्हा गोलंदाजाने चेंडू टाकण्याआधी क्रिझ सोडतो आणि गोलंदाज त्याला बाद करतो. अशा प्रकारे फलंदाजाला बाद केल्यास त्याला मांकडिंग असे म्हणतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या