Ticker

6/Breaking/ticker-posts

सुनील गडाख यांच्याकडून प्राथमिक आरोग्य केंद्राला इन्व्हर्टर व बॅटरी भेट

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 शनिशिंगणापूर:  येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा परिषदेचे अर्थ,बांधकाम, व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी स्वखर्चाने एक इन्व्हर्टर व दोन बॅटरी असा ४० हजाराचा संच नुकताच भेट  देण्यात आला. कित्येक वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजपुरवठा खंडित झाला तर   विजेची कुठलंही पर्यायी व्यवस्था नव्हती त्यामुळे जीवन मरणाचा प्रश्न रुग्णांना पडत होता,ती एक भीती वाटत होती, आता या ठिकाणी इन्व्हर्टर व दोन बॅटरी संच मिळाल्याने विजेचा लखलखाट दिसणार आहे, त्याच प्रमाणे रुग्णाची,अधिकाऱ्यांची धाकधुकी गायब झाली आहे.

 या अगोदर अनेकदा तेथील समस्यांची तक्रारी केल्या जात होत्या,आणि रुग्णाची गर्दी व विजेच्या प्रश्नांची गरज पाहता जिल्हा परिषदेचे अर्थ,बांधकाम, व पशुसंवर्धन विभागाचे सभापती सुनील गडाख यांनी स्वखर्चाने एक इन्व्हर्टर व दोन बॅटरी असा ४० हजाराचा संच नुकताच भेट  देण्यात आला.

  सुनील गडाख यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर श्री. राजेंद्र कसबे यांच्याकडे सुपूर्त केले..या प्रसंगी सोनई पंचायत समितीचे सदस्य श्री.कारभारी  डफाळ,सोनई ग्रामपंचायतचे सरपंच श्री. धनंजय वाघ , ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री राजेंद्र बोरुडे ,विद्यमान सदस्य श्री.सखाराम राशिनकर, विद्यमान सदस्य श्री. बापूसाहेब ओहळ, ग्रामपंचायत सदस्य श्री.सुनिल तागड ग्रामपंचायत सदस्य श्री. नवनाथ दरंदले ,सोनई सोसायटीचे माजी चेअरमन श्री.आप्पासाहेब निमसे श्री. येळवंडे आदी उपस्थित होते. आभार विजय खंडागळे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या