*शेतकऱ्यांसाठी
ऑनलाईन “ ई पिक पहाणी नोंदणी ” चर्चा
सत्र संपन्न
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पारनेर: कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर व वाळुंज
फार्मर प्रोडयुसर कंपनी वाळुंज यांचे संयुक्त विद्यमाने दि.11 रोजी ई पीक पहाणी नोंदणी कशी
करावयाची याविषयी ऑनलाईन झुममिटींग व्दारे मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
पारनेर
तालुक्यासह अहमदनगर जिल्हयातील अनेक शेतकरी बांधवांनी सहभाग नोंदवुन मार्गदर्शनाचा
लाभ घेतला असल्याचे सभापती प्रशांत गायकवाड यांनी सांगितले. चर्चा सत्राचे
सुरुवातीला सभापती प्रंशांत गायकवाड यांनी या ई पीक पहाणी नोंदणी या महाराष्ट्र
शासनाने सुरु केलेल्या शेतकऱ्यांना कुठे तरी स्वातंत्र्य असलेले हे ॲप उपलब्ध
करुण दिल्याबद्दल शासनाचे आभार मानले सत्राचे मार्गदर्शक तलाठी एस.यु.मांडगे,पारनेर व कृषी सहाय्यक शुभम काळे
याचे स्वागत करुन सत्कार करण्यात आला.
यावेळी
बोलताना सभापती गायकवाड यांनी या पुढे ई पीक पहाणी ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत
महत्वाची आहे.यापुढे शासनाचे आधारभुत किंमतीने शेतमाल खरेदी,सर्व प्रकारची शेतकरी अनुदान,क्षेत्रवाढ , विमा नुकसान भरपाई,शासकीय मदत या योजना या माध्यमातुन मिळणार आहेत.त्यामुळे कृषी उत्पन्न
बाजार समितीची नैतिक जबाबदारी व कर्तव्य समजुन या चर्चा सत्राचे आयोजन केले असल्याचे सांगितले.
या चर्चा सत्रात या ई पीक पहाणी ॲप
निर्मीतीसाठी राज्याचे असणारे समन्वयक पुणे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप
हे सहभागी होवुन त्यांनी पण शासनाचे पिकेल ते विकेल ही जी संकल्पना
आहे. ती खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येणार आहे.यावेळी सभापती प्रशांत गायकवाड यांनी
पारनेर तालुक्यात सध्या खरीप हंगामातील मुग,उडीद ही पीके
काढणी होवुन गेलेली आहेत व त्यामुळे त्यांची नोंदणी करणे शेतकऱ्यांना शक्य होणार
नाही .त्यासाठी शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध करुण देण्याची आग्रही मागणी करणेत आली
चर्चा सत्रामध्ये प्रांतधिकारी सुधाकर भोसले यांनी सहभाग नोंदवुन मार्गदर्शन
केले.शेतकऱ्यांना यापुढे या ई पीक पहाणी नोंदणी विषयी काह अडचणी असल्यास वाळूंज
फार्मर प्रोड्यूसर कंपनी यांचा टोल फ्री नंबर.9028055530किंवा
शासनाने ही टोल फ्री नंबर (020)25712712 यावर संपर्क करण्यात
यावा. चर्चा सत्राचे शेवटी प्रश्नोत्तर आयोजीत करुन शेतकऱ्यांचे अनेक शंकाचे
निरसन केले
0 टिप्पण्या