Ticker

6/Breaking/ticker-posts

कर्जत नगरपंचायतीच्या१७ पैकी १६ जगा जिंकू - नामदेव राऊत

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 कर्जत : काम करणाराच्या पाठीमागे जनता कायम उभी राहते. त्यामुळेच वीस वर्ष सरपंच व पाच वर्ष नगराध्यक्ष झालो, आगामी कर्जत नगरपंचायत निवडणुकीमध्ये आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली १७ पैकी १६ जागा जिंकुन विकासकामांचा राहिलेला अनुशेष भरून काढनार आहे. असा निर्धार नामदेव राऊत यानी व्यक्त केला.

 आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या वतीने प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .यावेळी प्रमुख वक्ते म्हणून भाजपा मधून नुकतेच राष्ट्रवादी प्रवेश केलेले माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत  हे कार्यक्रमाचा फड गाजवित आहेत.  यावेळी बोलताना नामदेव राऊत म्हणाले येणाऱ्या. या आगोदर एकदा राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला होता परंतु शहरातुन पक्षातील लोकांचा त्रास सुरू झाल्याने मी माझ्या मुळ पक्षात परत आलो . त्रास कोणाचा होता हे नाव मी सांगनार नाही असे म्हणताच उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला . माझी काम करण्याची पध्दत पाहून एक सदस्य असताना सुध्दा विरोधी सदस्यांनी माझ्या पत्नीला अडीच वर्ष पंचायत समितीचे सभापती केले होते.शिबिरात विक्रमी बाटल्या रक्तसंकलन करण्यात आले. प्रत्येक रक्तदात्यास एक ट्रॅक सुट, मास्क , सॅनिटाईझरची बाटली भेट देण्यात आली .

 कार्यक्रमास कर्जत पंचायत समितीच्या माजी सभापती आश्विनीताई कानगुडे, दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलिप हंडाळ, कर्जत पंचायत समितीचे उपसभापती  राजेंद्र गुंड, मा.उपसभापती हेमंत मोरे. मा.पंचायत समिती सदस्य प्रा.आण्णासाहेब मोरे, राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष नितिन धांडे , राष्ट्रवादी कॉग्रेस दौंड चे युवा नेते तुषार रमेश(आप्पा)थोरात ,स्वाती राऊत , विजय मोढळे, अॅड सुरेश शिंदे , पै. शामभाऊ कानगुडे, रामचंद्र खराडे, आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या