लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
दिगंबर टोके, परमेश्वर शिंदे,मधुकर पाटेकर, संदीप शिंदे, बाळासाहेब देवढे, या ग्रामस्थांच्या उपस्थित समक्ष पंचनामा करण्यात आला. मात्र सदर दुकानदारांनी पॉश मशीनचा वाफर न करता धान्याचे वाटप केले जात असून व ग्राहकांना धान्य दिले तर रीतसर पावत्या दिल्या जात नाहीत असा आरोप ग्रामस्थ शेखर बामदळे यांनी अधिकाऱ्यांसमोर केला तसेच स्वस्त धान्य चालक शिवाजी काकडे या दुकानदारांनी पॉश मशीन गायब केले व गावात नोंदणीसाठी पाठवले आहे अशी खोटी माहिती ग्रामस्थांना व अधिकाऱ्यांना दिली ग्रामस्थ दुकानदाराच्या उडवाउडवीच्या उत्तरामुळे अत्यंत संतप्त झाले होते सदर मशीन घेऊन या अशी ग्रामस्थांनी जोरदारपणे मागणी केली. पण मशीन बाहेर गेले असे खोटे दुकानदारांनी सांगितले पण सदर पॉश मशीन दुकानदाराच्या जवळ असलेल्या पिशवीची ग्रामस्थांनी झडती घेतल्याने त्यामध्ये स्पॉश मशीन आढळून आल्याने ग्रामस्थ अत्यंत आक्रमक झाले होते यावेळी ग्रामस्थांनी संबंधित दुकानदाराला व अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले गेले संबंधित दुकानदाराच्या विरोधात अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत पॉश मशीन संबधित अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे त्यामध्ये काय निष्पन्न होईल तसेच वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे .
टेम्पोत बारदाण्या व्यतिरिक्त काही नव्हते
दिनांक ११ रोजी तहसीलदार यांच्याकडे दूरध्वनीवरून केलेल्या तक्रारींच्या कामी आलेल्या अधिकारी यांनी माझे दुकानाचा साठा माझ्या समक्ष २४ कट्टे व ३ चुंगडे तांदळाचे भरले ते बरोबर आहे. मी बारदाण्यासाठी टेम्पो बोलवला होता. त्याच्यामध्ये बारदाण्या व्यतिरिक्त काही नव्हते मी सकाळी गहू, तांदूळ वाटप केलेले आहे.
शिवाजी शंकर काकडे
स्वस्त धान्य दुकानदार, बालमटाकळी
0 टिप्पण्या