Ticker

6/Breaking/ticker-posts

पंचनाम्याचे केवळ नाटक नको, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्या- मा.सरपंच कासुळे

 भालगावचे माजी सरपंच अकुंशराव  कासुळे यांची मागणी











लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

खरवंडी कासार :  टाकळी मानुर मंडळातील भालगाव खरवंडी मिडसांगवी परिसरात   जोरदार पाऊस झाल्याने  शेतामधील   पिके पाण्यात आहेत पचंनाम्या चे नाटक न करता शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी भालगावचे माजी सरपंच अकुंशराव कासुळे यांनी केली आहे.


पाथर्डीच्या  पूर्व भागात भालगाव गटात भालगाव खरवंडी कासार भारजवाडी मालेवाडी मिडसांगवी जवळवाडी  ढाकणवाडी जवळवाडी मुंगूसवाडे सततच्या  पडणाऱ्या पावसाने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे यामध्ये शेतीमध्ये असलेला पिके पिवळसर पडली आहेत मूग उडीद या कडधान्य पिकाला पावसामुळे कोंब आले आहेत त्यामुळे व्यापारी वर्ग या शेतीच्या मालाला घेत नसून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.


राजकीय नेते व शासकीय अधिकारी वर्ग फक्त शेतीमालाचे नुकसान पाहून गेले आहेत .परंतु कुठलेही पंचनामे केले नाहीत,  त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्याला मदत मिळेल का नाही,शेतकरी शासनाच्या मदतीची वाट पाहत आहे. मुग उडीद ,बाजरी ,भुईमूग ,कपाशी हे शेती पिके  पिवळी पडून पाण्यात सडत आहेत. व हातात आलेले पिक पावसाच्या पाण्याने  भिजल्यामुळे व्यापारी माल विकत घेत नाही . त्यामुळे आपण पेरणी केलेल्या बियाण्याचे सुद्धा पैसे निघत नाहीत त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे त्यामुळे मदत मागायची कुणाकडे  शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.


 यावर नेतेमंडळी व प्रशासनचे अधिकारी बोलायला तयार नाही यामुळे मदत मिळते की नाही ,असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे .भालगावचे माजी सरपंच अंकुश कासुळे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून सरसकट मदतीची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा नाहीतर शासनाच्या विरोधात मोठे आंदोलन उभारले जाईल असा इशारा यावेळी त्यांनी इशारा दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या