Ticker

6/Breaking/ticker-posts

ऑनलाईन मैत्रीचा फंडा.. मित्रासाठी मुलीनं घरातील ७५ तोळे सोनं चोरुन दिल भेट !

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

तिरुअनंतपुरकेरळच्या तिरुअनंतपुरममध्ये एक धक्कादायक घटना समोर आलीय. या घटनेमुळे तपास करणारे पोलीस अधिकारीही चक्रावलेत. संबंधित प्रकरणात एका दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीनं सोशल मीडियावर झालेल्या मैत्रीसाठी घरातून तब्बल ७५ तोळे सोनं गायब केलंय. बाजारभावानुसार, या सोन्याची किंमत जवळपास ३७ लाख रुपयांच्या आसपास असू शकते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारकरोना संक्रमणाच्या काळात शिबीन नावाच्या एका व्यक्तीनं सोशल मीडियावर आपण आर्थिक अडचणीत असल्याची पोस्ट टाकली होती. ही पोस्ट पाहिल्यानंतर संबंधित अवघ्या १५ वर्षांच्या शालेय विद्यार्थीनीनं त्याच्याशी सोशल मीडियावरून संपर्क साधला. शिबीनशी काही संवादानंतर या मुलीन त्याची मदत करण्याचा निर्णय घेतला.

इथपर्यंत विद्यार्थीनीचा हेतू योग्य होता. परंतुऑनलाईन मित्राच्या मदतीसाठी मुलीनं चुकीचा मार्ग निवडला. आपल्याच घरात पालकांनी गुप्त ठेवलेलं सोनं त्यांच्या नकळत काढून मित्राला दिल्याचं पोलीस तपासात या मुलीनं मान्य केलंय.


विद्यार्थीनीच्या घरात बेडरुममध्ये गुप्त पद्धतीनं हे सोनं ठेवण्यात आलं होतं. परंतुअचानक सोनं गायब झाल्यानंतर विद्यार्थीनीच्या आईनं पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी शिबीन आणि त्याची आई शाजिला यांना अटक केली.

चौकशीत तीनं जवळपास वर्षभरापूर्वी तीनं शिबीनला सोनं दिल्याचं मान्य केलं. आईच्या मदतीनं शिबीननं हे सोनं विकलं. त्यांनी आपल्या घराचं कामही करून घेतलं तसंच उरलेले ९.८ लाख आपल्या घरात ठेवले. पोलिसांनी शिबीनच्या घरातून हे पैसे जप्त केलेत.

परंतुयाच दरम्यान या प्रकरणानं वेगळं वळण घेतलं. शिबीनच्या चौकशीत विद्यार्थीनीनं त्याला ७५ तोळे सोनं दिलंच नसल्याचं समोर आलं. शिबीनला केवळ २७ तोळे सोनं मिळालं होतं. हे समजल्यानंतर पोलिसांनी पुन्हा विद्यार्थीनीची चौकशी केली तेव्हा तीनं ४० तोळे सोनं पलक्कड जिल्ह्यातील दुसऱ्या एका तरुणाला दिल्याचं मान्य केलं. या तरुणाशी आपली ओळख  इंन्स्टाग्रामद्वारे झाल्याचंही मुलीनं म्हटलं. मात्रसोनं मिळाल्यानंतर या तरुणानं इन्स्टाग्रामवर आपल्याला ब्लॉक केल्याचं विद्यार्थीनी सांगत असली तरी पोलीस मात्र यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. पोलीस विद्यार्थीनीची आणखीन तपासणी करत आहेत.

सोबतचएवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं घरात का ठेवलं होतंयाचं उत्तरही विद्यार्थीनीची आई पोलिसांना देऊ शकली नाही. तसंच गेल्या वर्षभरापासून आपल्या घरातून ७५ तोळे सोनं गायब असल्याचंही तिच्या आईच्या लक्षात कसं आलं नाहीअसाही प्रश्न पोलिसांना पडलाय.

 







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या