Ticker

6/Breaking/ticker-posts

तालिबानची टरकली, सरकार स्थापन सोहळा केला रद्द ; सांगितले 'हे' हास्यास्पद कारण

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

काबूल: तालिबानने अफगाणिस्तानमधील सरकार स्थापन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी ९/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दिनीच तालिबान सरकार स्थापन सोहळा करणार असल्याचे वृत्त होते. आता मात्र, तालिबानने हा सोहळा कायम स्वरुपी रद्द केला असल्याचे वृत्त आहे. तालिबानने पैशांच्या अपव्ययाचे कारण देत सोहळा रद्द करत असल्याचे म्हटले.

तालिबानने दिलेले कारण हास्यास्पद असल्याचे विश्लेषकांनी म्हटले आहे. आपल्या दहशतवादी कारवायांसाठी पैशांचा चुराडा तालिबानने याआधी केला आहे. तालिबानने आपल्या सरकार स्थापनेच्या सोहळ्यास रशिया, इराण, चीन, कतार आणि पाकिस्तानला आमंत्रित केले होते. यापैकी रशियाने या सोहळ्यात हजर राहणार नसल्याचे म्हटले. काही वृत्तांनुसार, अमेरिका आणि नाटो देशांनी ९/११ या दहशतवादी हल्ल्याच्या दिनी तालिबानने सरकार स्थापन सोहळ्या विरोध करावा यासाठी कतारवर दबाव टाकला होता. या दिवशी सरकार स्थापन सोहळा करणे हे अमानवीय ठरले असते, असा मुद्दा यावेळी कतारकडे मांडण्यात आला होता.

तालिबानने मंगळवारी अफगाणिस्तानमधील एक अंतरिम सरकारची घोषणा केली होती. अफगाणिस्तानचे सरकार सर्वसमावेशक असेल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, तालिबानने या मंत्रिमंडळात कट्टरतावाद्यांना स्थान दिले असून अल्पसंख्यक धार्मिक, जातीय गट आणि महिलांच्या प्रतिनिधीत्वाकडे काना डोळा केला आहे.

तालिबानच्या सरकारमध्ये पंतप्रधान मुल्ला मोहम्मद हसन अखुंद याच्यासह १४ जण दहशतवादी म्हणून जाहीर करण्यात आले आहे. यातील अनेकांची नावे संयुक्त राष्ट्राने आणि अमेरिकेने बंदी घातलेल्या दहशतवाद्यांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या